Valentines Day 2023 : काय होती अनारकलीची शेवटची इच्छा?; ज्यामुळे बादशहा सलीम तर वाचले, पण...

सलीम-अनारकली, ऐतिहासातील सर्वात चर्चेत असलेली प्रेमकथा!
Valentines Day 2023
Valentines Day 2023esakal

व्हॅलेंटाईन विकच्या आजच्या भागात इतिहासातील एक महान ठरलेल्या जोडीबद्दल जाणून घेऊयात. ती म्हणजे बादशहा सलीम आणि अनारकली यांची. सलीम अनारकलीच्या उल्लेखाशिवाय प्रेम पटवून देणे केवळ अशक्यच. त्यामुळेच प्रेमाचा उल्लेख जिथे होईल तिथे सलीम अनारकलीचे नाव ओठावर येते.

प्रेमाला विरोध तर आजही केला जातो. पण, केवळ प्रतिष्ठेच्या पायी मुलांच्या आनंदाचा विचार न करणारे महाभाग आजही आहेत. त्या काळात सलीम तर मुघल सम्राट अकबराचा एकुलता एक मुलगा. तो ऐषारामात वाढला आणि तो प्रेमाच्या बाबतीत हौशी होता. त्यांनी जवळपास 20 लग्ने केली होती.

अनेक विवाह त्यांच्या राजकीय कारणांमुळेही झाले. मात्र, जेव्हा सलीमची नजर आपले वडील मुघल सम्राट अकबर यांच्या दरबारातील नृत्यांगना अनारकली उर्फ ​​नादिरा हिच्यावर पडली. तिच्या विलोभनिय रूपाची जादू पाहूव सलीम तिच्या प्रेमात पडले.

अनारकली सुंदर तर होतीच पण ती एक चांगली नृत्यांगणाही होती. एकदा सलीम यांनी तिला नाचताना पाहिलं ते तिचं कौतुक केल्याशिवाय राहू शकले नाहीत. यानंतर सलीम यांनी आनंदी होऊन अनारकलीला आपली दरबारी नर्तिका म्हणून घोषित केले.

Valentines Day 2023
Valentine Day Shikhar Dhawan : नशिबात नाही परी तर... शिखरचा व्हॅलेंटाईन स्पेशल VIDEO होतोय व्हायरल

तिचे सौंदर्य आणि नृत्याचे गुण पाहून सलीमने तिला "अनारकली" असे नाव दिले. दुसरीकडे, अनारकलीच्या सुंदरतेने आणि साधेपणाने प्रभावित झालेल्या राजकुमार सलीमने जेव्हा तिच्यासमोर आपले प्रेम व्यक्त केले, तेव्हा सुरुवातीला अनारकलीने नर्तक आणि राजकुमार यांच्यात प्रेमसंबंध असू शकत नाहीत. असे सांगून त्यांना नकार दिला.

सलीमच्या अफाट प्रेमापासून स्वतःला फार काळ दूर ठेवणे शक्य झाले नाही. अनारकलीनेही सलीमवर प्रेम करायला सुरुवात केली. हळूहळू त्यांचे प्रेम वाढू लागले. दोघांमध्ये सर्व काही सुरळीत चालले असताना सलीमची बेगम नूरजहान हिने त्या दोघांना पाहिले आणि सलीम उर्फ ​​जहांगीरने आपल्याशिवाय इतर कोणावरही प्रेम करू नये असे तिला वाटत नव्हते.

Valentines Day 2023
Valentines Day 2023 : प्रियसीच्या ‘त्या’ चुकीमुळे मिर्झा-साहिबा यांचे प्रेम अमर झाले!  

तिने या प्रेम प्रकरणाची माहिती मुघल सम्राट बादशहा अकबराला दिली. जेव्हा मुघल सम्राट अकबरला त्याचा मुलगा सलीम आणि अनारकली यांच्या प्रेमकहाणीबद्दल कळले तेव्हा तो खूप संतापला. कारण अकबराला मुघल राजपुत्र सलीमचे नाव एखाद्या नृत्यांगनासोबत जोडायचे नव्हते. अकबर सलीम आणि अनारकली यांच्यातील संबंधांच्या पूर्णपणे विरोधात होता.

अकबरला मुघल सल्तनतच्या प्रतिष्ठेची चिंता होती. त्यामुळे सलीम आणि अनारकलीला त्यांने वेगळे करण्याचा निर्णय घेतला. सम्राट अकबराने त्याचा मुलगा सलीमला अनारकलीसोबतचे प्रेमसंबंध तोडून तिला कधीही भेटू नकोस. अशी सूचना केली. पण सलीमचेही अनारकलीवर खूप प्रेम होते. त्यामुळे त्याने वडिलांचे न ऐकता अनारकलीला भेटणे सुरूच ठेवले.

Valentines Day 2023
Valentines Day 2023 :  महात्मा गांधींचाही पाय घसरला होता; लग्नानंतर पडले होते या महिलेच्या प्रेमात!

त्यामुळे अकबर आणि सलीम यांच्यातील संबंध आणखी बिघडले आणि नंतर दोघांमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली. दुसरीकडे सलीमचे अनारकलीवर इतके प्रेम होते की त्याने वडिलांविरुद्ध बंडखोरी सुरू केली. अकबरानेही अनारकलीला फाशीची शिक्षा जाहीर केली. त्यासाठी अनारकलीचा सर्वत्र शोध घेण्यात आला.

Valentines Day 2023
Valentines Day 2023 : हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे; तरुणाईची साद!

सलीमच्या शुभचिंतकांनी आधीच अनारकलीला लाहोरहून दूर नेले. आणि लपवून ठेवले. दुसरीकडे सलीमला हे चांगलेच समजले होते की त्याचे वडील त्याच्या प्रेमाचे खरे शत्रू आहेत. म्हणून त्याने आपले वडील अकबराच्या विरोधात सैन्य तयार केले. युद्ध सुरू केले, तरीही मुघल बादशहाच्या प्रचंड सैन्यासमोर सलीम अकबराला पराभवाला सामोरे जावे लागले.

Valentines Day 2023
Kiss Day 2023 :  जगातला पहिला Kiss कोणी घेतला होता?

त्यानंतर अकबराने आपला मुलगा सलीमला कैद केले आणि त्याच्या सुटकेसाठी त्याच्यासमोर दोन अटी घातल्या. एकतर त्याने अनारकलीला त्याच्या स्वाधीन करावे किंवा आपला जीव वाचवावा. पण, सलीमने प्रेमापुढे जीवाची पर्वा केली नाही. त्याने युद्ध केले. त्या युद्धात सलीम यांना बंदी बणवण्यात आले. त्यांना दरबारात हाजीर केल्यावर पुन्हा एकदा अनारकलीला विसरून जा आणि जीव वाचव असे सांगण्यात आले. तेव्हा मला हे शक्य नाही. असे सलीमने सांगितले. त्यावर बादशहा अकबराने सलीमला देहदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

Valentines Day 2023
Kiss Day 2023 : या बॉलीवूड किसींग सीननं तरुणांना लावलंय भलतंच वेड...

जेव्हा अनारकलीला सलीमच्या शिक्षेची माहिती मिळाली तेव्हा तिने स्वतःला मुघल सम्राट अकबराच्या स्वाधीन केले. सलीमच्या सुटकेसाठी अकबराकडे विनवणी केली.  ज्यानंतर मुघल सम्राट अकबराने अनारकलीला भिंतीत जिवंत गाडण्याची वेदनादायक शिक्षा दिली. ही शिक्षा देण्यापूर्वी अनारकलीची शेवटची इच्छा विचारली.

Valentines Day 2023
Kiss Day : सब्र करो भाई, किस करताना करू नको घाई

तेव्हा मला एका दिवसासाठी मलिका ए हिंदुस्थान बनायचे आहे. मला एक दिवस सलीमसोबत जगायचे आहे, त्यानंतर मी पुन्हा फिरकूनही शहजादा सलीमकजे येणार नाही, असे तिने सांगितले. मुघल सम्राट अकबराने अनारकलीची शेवटची इच्छा पूर्ण होऊ दिली. ती एक रात्र घालवल्यानंतर शहजादा सलीमला बेशुद्ध करून अनारकली तिथून निघून गेली. दुसऱ्याच दिवशी अनारकलीला जिवंत कोठडीची शिक्षा झाली.

Valentines Day 2023
Valentine Week Special : पार्टनरला इम्प्रेस करायचंय? मग ट्राय करा हे 5 Whatsapp फिचर

अशाप्रकारे या रात्रीनंतर सलीम आणि अनारकली दोघेही एकमेकांपासून कायमचे विभक्त झाले. पण या दोघांची प्रेमकथा इतिहासाच्या पानात कायमची अजरामर झाली. असे म्हटले जाते की, अनारकलीची आई नूर खान अर्गन, जी एक नर्तिका होती. ती मुघल दरबारातील खूप चांगली नृत्यांगना, आणि तिच्या नृत्याने प्रभावित होऊन, एकदा मुघल सम्राट अकबराने तिला हवं ते मागण्याचे वचन दिले होते.

Valentines Day 2023
Valentine Week : बायकोसाठी जीव ओवाळून टाकणारे नवरे! या कहाण्या चुकून तुमच्या बायकोने वाचल्या तर...

तेव्हा नूरखानने काहीही मागितले नाही. पण जेव्हा त्या आईने अकबरला आपल्या मुलीला अशी वेदनादायक शिक्षा देताना पाहिले. तिने अकबरला त्याच्या वचनाची आठवण करून दिली. आणि आपली मुलगी अनारकलीचे आयुष्य मागितले.

Valentines Day 2023
Valentine Day : ज्या मुलांकडे हे गुण असतात त्याच मुलांच्या प्रेमात पडतात मुली

त्यानंतर असे मानले जाते की अकबर आपले वचन पूर्ण करण्यासाठी एका बोगद्यातून वाट काढत अनारकलीला लाहोरच्या बाहेर पाठवले. तसेच. तिच्याकडून वचनही घेतले की ती पुन्हा शहजादा सलीमला कधीच भेटणार नाही. हे वचन देऊन अनारकली निघून गेली आणि या प्रेमकहानीचा शेवट झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com