
Valentine Day Shikhar Dhawan : नशिबात नाही परी तर... शिखरचा व्हॅलेंटाईन स्पेशल VIDEO होतोय व्हायरल
Valentine Day Shikhar Dhawan Video : भारताचा कसोटी संघ सध्या नागपुरात ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिका खेलत आहे. तर संघात स्थान न मिळालेला सलामीवीर शिखर धवन सोशल मीडियावर रील्स करण्यात व्यग्र आहे. खिशर धवन गेल्या काही दिवसांपासून त्याच्या घटस्फोटासंदर्भातील बातम्यांनी चर्चेत आला होता. आता त्याचा व्हॅलेंटाईन डे संदर्भातील एका व्हिडिओ चर्चेत आला आहे.
जरी शिखर धवनचा घटस्फोट झाला असला तरी या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत तो आनंदी दिसत असल्याचे दिसते. मात्र हा आनंद वरवरचा असल्याचे लगेच जाणवते.
शिखर धवनने आपल्या इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत शिखर धवनला त्याचा व्हॅलेंटाईन डेला काय प्लॅन आहे असे विचारले गेले. त्यावर शिखरने दिलेल्या उत्तरावर त्याच्या मनातील सल दिसून येते.
या व्हिडिओत एक व्यक्ती शिखर धवनला विचारतो की या व्हॅलेंटाईन डेला काय प्लॅन आहे त्यावेळी सोफ्यावर लोळत पडलेला शिखर म्हणतो की, 'जर नशिबात नसले परी तर कुठला 14 फेब्रुवारी'
हा व्हिडिओ जरी लायटर नोटवर तयार करण्यात आला असला तरी धवनच्या कौटुंबिक आयुष्टात भूकंप आला आहे. शिखर पत्नीपासून वेगळा झाला आहे. याचा अर्थ यंदाचा व्हॅलेंटाईन शिखरसाठी रूक्ष जाणार आहे. म्हणूनच शिखर धवनला आता शायरी सुचत आहे. शिखर धवनचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हेही वाचा : अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम