

Vande Bharat Organ Transport
esakal
नवी दिल्ली: भारतीय रेल्वेने आज इतिहास घडविला. प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’मधून प्रथमच मानवी हृदय सुरतहून अहमदाबादला सुरक्षितरीत्या आणण्यात आले. आपत्कालीन आरोग्य सेवेमध्येही देश आघाडीवर असल्याचे या निमित्ताने सिद्ध झाले. मुंबई सेंट्रल-गांधीनगर कॅपिटल वंदे भारत एक्स्प्रेसने (गाडी क्र ः २०९०१) ही कामगिरी पार पाडली आहे.