Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत रेल्वे आता स्लीपर कोचमध्ये, 'या' मार्गावर धावणार; पैसा आणि वेळेचीही होईल बचत

Vande Bharat Sleeper Coach Train : वंदे भारत रेल्वे आता स्लीपर कोचमध्ये धावणार असून निवडक मार्गांवर ही सेवा सुरू होणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे.
Vande Bharat sleeper train route details

Vande Bharat sleeper train route details

esakal

Updated on

New Vande Bharat Route : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने देशाला मोठी रेल्वे विभागाकडून मोठी भेट दिली आहे. देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन गुवाहाटी ते कोलकाता या मार्गावर धावणार असून, या ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी याच महिन्यात हिरवा झेंडा दाखवणार आहेत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत स्लीपर ट्रेनचा मार्ग, भाडे आणि अत्याधुनिक सुविधांची माहिती दिली आहे.

१५ ते २० जानेवारीदरम्यान उद्घाटन

वंदे भारत स्लीपर ट्रेनचे उद्घाटन १५ ते २० जानेवारीदरम्यान होण्याची शक्यता असून, १७ किंवा १८ जानेवारी ही संभाव्य तारीख मानली जात आहे. या ट्रेनमुळे ईशान्य भारतातील प्रवाशांना कोलकात्यापर्यंतचा प्रवास अधिक सुलभ, जलद आणि आरामदायी होणार आहे. रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील सहा महिन्यांत ८ नवीन वंदे भारत स्लीपर गाड्या सुरू करण्यात येणार असून, वर्षभरात एकूण १२ गाड्या सेवेत दाखल होतील. या स्लीपर गाड्यांमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत.

भाडे किती?

गुवाहाटी–कोलकाता मार्गावर थर्ड एसी : २,३०० रुपये, सेकंड एसी : ३,००० रुपये, फर्स्ट एसी : ३,६०० रुपये असे संभाव्य भाडे असणार आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेन ही सेमी हाय-स्पीड असून, तिचा कमाल वेग १८० किमी प्रतितास आहे. या ट्रेनमध्ये एकूण १६ डबे असतील. यामध्ये ११ थर्ड एसी, ४ सेकंड एसी, १ फर्स्ट एसी असेल तर थर्ड एसीमध्ये ६११, सेकंड एसीमध्ये १८८ आणि फर्स्ट एसीमध्ये २४ बर्थ असतील. एकूण ८२३ प्रवासी या ट्रेनमधून प्रवास करू शकणार आहेत.

वंदे भारत स्लीपर ट्रेनची वैशिष्ट्ये

आरामदायक बर्थ : विशेष डिझाइन, मऊ गाद्या आणि सुधारित कुशन

ऑटोमॅटिक दरवाजे : डब्यांमधील हालचालीसाठी जोडलेले वेस्टीब्यूल

कमी आवाज व चांगले सस्पेन्शन : शांत आणि आरामदायी प्रवास

सुरक्षा व्यवस्था : ‘कवच’ अँटी-कोलिजन प्रणाली, इमर्जन्सी टॉक-बॅक सिस्टीम

स्वच्छता : डिसइन्फेक्टंट तंत्रज्ञानाद्वारे स्वच्छ कोच

आधुनिक ड्रायव्हर केबिन : लोको पायलटसाठी अत्याधुनिक नियंत्रण प्रणाली

एरोडायनामिक डिझाइन : उच्च वेगातही स्थिरता राखणारी रचना

ही वंदे भारत स्लीपर ट्रेन भारतीय रेल्वेच्या आधुनिकतेकडे टाकलेले आणखी एक महत्त्वाचे पाऊल ठरणार असून, दीर्घ पल्ल्याच्या प्रवासाचा अनुभव अधिक आरामदायी आणि सुरक्षित करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com