देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपरची तिसऱ्या दिवशी यशस्वी चाचणी घेण्यात आली. राजस्थानमधील कोटा आणि लबान दरम्यानच्या 30 किमीच्या पट्ट्यात ते 180 किमी/तास वेगाने धावली. यावेळी प्रवाशांची वहन क्षमता लक्षात घेऊन चाचणी पुढे नेण्यात आली. चाचणीच्या वेळी या ट्रेनचा वेग ताशी 180 किलोमीटर होता. सर्व प्रकारच्या परिस्थितीत गाडी चालवण्याची क्षमता तपासण्यासाठी वळणदार ट्रॅकवरही चाचणी घेण्यात आली. यावेळी ग्लासातून पाण्याचा एक थेंब देखील सांडला नसल्याचा व्हिडिओ रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्हिडिओ शेअर केला आहे.