Vande Bharat Train
esakal
आसाममध्ये कोलकाता-सायरंग एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याच्या घटनेनंतर रेल्वे प्रवासाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला. त्यातच देशातील आधुनिक ट्रेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसबाबत एक धक्कादायक बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ब्रेकिंग सिस्टीममध्ये बिघाड असतानाही ही ट्रेन तब्बल ४६३ किलोमीटर धावल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणात रेल्वेने आता स्पष्टीकरण दिलं आहे.