Vande Bharat: काशी ते खजुराहो, लखनऊ ते बंगळूरू! वंदे भारतने जोडला प्रगतीचा महामार्ग; मोदींचा संदेश, भारताची यात्रा आता नव्या वेगात
PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशीहून खजुराहो, लखनऊ व बंगळूरू या मार्गांवरील चार वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. ही भारताच्या वेगवान प्रगतीची नवी ओळख ठरली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी वाराणसी रेल्वे स्टेशनवरून चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. या गाड्या बनारस-खजुराहो, लखनऊ-सहारनपूर, फिरोजपूर-दिल्ली आणि एर्नाकुलम-बंगळूरू या मार्गांवर धावणार आहेत.