'या' सर्वात जुन्या धरणासाठी म्हैसूरच्या महाराजांनी राजेशाही दागिने ठेवले होते 'गहाण'; काय आहे धरणाची खासियत?

कर्नाटकात स्वातंत्र्यपूर्वकाळात वेदावती नदीवर ‘वाणी विलास सागर’ नावाचे धरण म्हैसूर महाराजांनी (Mysore Maharaja) बांधले.
Vani Vilas Sagar Dam
Vani Vilas Sagar Damesakal
Summary

वाणी विलास सागर धरणाला (Vani Vilas Sagar Dam) ‘मरी कनिवे’ या नावानेही ओळखले जाते. कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग (Chitradurga) जिल्ह्यातील हिरियूर तालुक्यात हे धरण आहे.

कर्नाटकात स्वातंत्र्यपूर्वकाळात वेदावती नदीवर ‘वाणी विलास सागर’ नावाचे धरण म्हैसूर महाराजांनी (Mysore Maharaja) बांधले. ‘वाणी विलास सागर’ हे राज्यातील सर्वांत जुने धरण आहे. हे धरण म्हणजे १२७ वर्षांपूर्वीचा आर्किटेक्चरचा (वास्तुकला) एक उत्कृष्ट नमुना आहे. त्याबरोबरच त्या काळातील एक अभियांत्रिकीचा चमत्कारही आहे. यातून जलनीती, जलव्यवस्थापन, जलसंवर्धन, प्रजाहित, भविष्याची गरज याकडे पाहण्याचा म्हैसूरच्या महाराजांचा डोळस दृष्‍टिकोन दिसून येतो.

वाणी विलास सागर धरणाला (Vani Vilas Sagar Dam) ‘मरी कनिवे’ या नावानेही ओळखले जाते. कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग (Chitradurga) जिल्ह्यातील हिरियूर तालुक्यात हे धरण आहे. हिरियूर शहराच्या पश्चिमेस सुमारे २१ किलोमीटर तर चित्रदुर्गाच्या दक्षिणेस ५५ किलोमीटर आणि बंगळूरहून १८० किलोमीटर अंतरावर आहे. हे धरण मध्य कर्नाटकातील मोठ्या कोरडवाहू प्रदेशाला फुलविते. उजव्या आणि डाव्या कालव्यांद्वारे हिरियूर तालुक्यातील तब्बल १०० चौरस किलोमीटर जमीन सिंचनाखाली आलेली आहे. वाणी विलास सागर धरणामुळे हे हिरियूर, होसदुर्ग, चित्रदुर्ग आणि चळ्ळकेरेसाठी पिण्याच्या पाण्याचा स्रोतही बनले आहे.

वेदवती नदीवर ‘वाणी विलास सागर’ धरण बांधण्याची संकल्पना ही म्हैसूरच्या द्रष्ट्या महाराजांची होती. १८९७ साली म्हणजे तब्बल १२७ वर्षांपूर्वी म्हैसूर संस्थांनाच्या महाराजांचा धरण बांधण्याचा निर्णय किती मोठा होता, याची प्रचिती येते. या प्रकल्पाची सुरुवात ‘रिजेंट क्वीन’ महाराणी केम्पा ननजम्मानी वाणी विलास सन्निधान यांनी केली होती. त्या महाराजा चामराज वडेयर यांच्या विधवा पत्नी होत्या. त्या सामाजिक कार्यासाठी ओळखल्या जातात. या धरणाच्या बांधकामासाठी म्हैसूरच्या राजघराण्याला पैशांच्या कमतरतेमुळे राजेशाही दागिनेही गहाण ठेवावे लागले होते. म्हणूनच या धरणाचे नाव ‘वाणी विलास सागर’ असे ठेवण्यात आले.

Vani Vilas Sagar Dam
Kolhapur Flood : आलमट्टी धरणाच्या पाण्यामुळं कोल्हापुरात पुराची समस्या; पूर टाळण्याबाबत अजितदादांनी दिले 'हे' निर्देश

'मरी कनिवे’ सिंचन प्रकल्पाची सुरुवात सर मार्क कब्बन यांनी केली होती. मार्क कब्बन हे ब्रिटिशांचे म्हैसूरमधील रहिवासी होते. म्हैसूरचे श्रीमंत महाराज श्री कृष्णराज वडेयर चतुर्थ यांच्या आदेशानुसार १८९७ मध्ये दिवाण शेषाद्री अय्यर यांनी धरणामध्ये सुधारणा करून घेतल्या. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे गेल्या शतकात बांधलेल्या म्हैसूरच्या सुप्रसिद्ध कृष्णराज सागर धरणापेक्षा ‘वाणी विलास सागर’ हे उंच आहे. धरणात ३० टीएमसी (अब्ज घनफूट) पाणी साठविण्याची क्षमता आहे. धरणाची पूर्ण जलाशय पातळी १३० फूट आहे; परंतु तिची पाण्याची पातळी १३५ फुटांपर्यंतही मोजता येण्यासारखी आहे. ही पाणीपातळी केवळ एकदा १९३३ मध्येच गाठली गेली होती. धरणातील पाणीपातळीने सर्वसाधारण १२० फुटांचा टप्पा अनेक वेळा ओलांडला आहे.

१९३२, १९३४, १९५६, १९५७, १९५८, २०००, २०२१ आणि २०२२ साली ही पाणीपातळी ओलांडल्याच्या नोंदी आहेत. २ सप्टेंबर २०२२ रोजी ८९ वर्षांनंतर या धरणाने मैलाचा दगड गाठला गेला. जेव्हा धरण १३० फूट उंचीपर्यंत काठोकाठ भरले. त्यावेळी धरणात ३,००० क्युसेक पेक्षा जास्त आवक सुरू होती; पण वाढत्या लोकसंख्येमुळे धरणातील पाणी अपुरे पडू लागले. त्यामुळे कर्नाटक सरकार विचार करून चित्रदुर्ग जिल्हा आणि चिक्कमंगळूर जिल्ह्याच्या पूर्व भागातील जनतेच्या पिण्याच्या आणि सिंचनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नवा प्रकल्प होती घेतला होता. कर्नाटक सरकारने अप्पर-भद्रा प्रकल्प नावाचा प्रकल्प होती घेतला. प्रकल्पानुसार १७ टीएमसीपैकी तुंगा-गजनूर धरणातून पाणी उपसा केले जाते. तर २९.९० टीएमसी पाणी भद्रा धरणातून उचलले जाते. त्या पाण्यापैकी दोन टीएमसी पाणी वाणी विलास सागर धरणाला दिले जाते.

Vani Vilas Sagar Dam
Monsoon Schedule : मॉन्सूनच्या वेळापत्रकात सतत बदल; खरिपावर परिणाम होण्याची शक्यता

हे धरण अनेक वर्षांपासून पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. तरी प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून याकडे दुर्लक्ष झाले आहे. अलीकडे वनविभागाने येथे विविध विकासकामे हाती घेतली आहेत. नजीकच्या जंगलाचे आच्छादन कायम ठेवण्यासाठी तसेच झाडांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ‘पंचवटी’ उद्यानाची उभारणी सुरू आहे. येथे जुन्या सांस्कृतिक गोष्टी पाहायला मिळतात. त्याबरोबरच औषधी वनस्पतींचे उद्यान बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे आता पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे हे धरण म्हणजे एक लोकप्रिय विकेंड पिकनिक स्पॉट बनले आहे. ‘पंचवटी’ उद्यानात औषधी वनस्पती आहेत, जे आपल्या सांस्कृतिक परंपरेचे प्रतिनिधित्व करतात. तेथे राशी, ‘सप्त स्वर’, ‘नवग्रह’ आणि बरेच काही व्यवस्थित मांडलेले दिसून येते. चित्रदुर्ग आणि होसदुर्गला येणारे पर्यटक अनेकदा हमखास ‘मरी कनिवे’ला भेट देतात.

तरुणांसाठी साहसी खेळ, क्रीडा

धरणाच्या बॅकवॉटर जलक्रीडेसाठी तयार केलेले आहेत. युवा जनसेवा आणि क्रीडा विभागाने परिसरातील तरुणांना साहसी खेळांकडे आकर्षित करण्यासाठी कार्यक्रम आखला आहे. जनरल थिमय्या ॲडव्हेंचर स्पोर्टस् अकादमीच्या मदतीने २.५ कोटी रुपये खर्चून साहसी क्रीडा केंद्राची योजना आखली जात आहे.

Vani Vilas Sagar Dam
Kolhapur Lok Sabha : 'या' प्रमुख नेत्यांच्या गावांतच मंडलिक पिछाडीवर; कारखाना संचालकांच्या गावांतही मताधिक्य नाही

आकडे बोलतात

  • चित्रदुर्ग जिल्ह्यात १८९७ ला निर्मिती

  • धरणातील सध्याचा साठा ः ३० टीएमसी

  • ५५५७ हेक्टर जमीन सिंचनाखाली

  • १५०० कोटी निधीतून होणार विकासकामे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com