

PM Narendra Modi, Defence Minister Rajnath Singh and CM Yogi Adityanath attend the Wings Over Ganges air show at Varanasi’s Namo Ghat.
esakal
भारतीय वायुसेनेच्या ९४ व्या वर्धापन दिनानिमित्त वाराणसीतील नमो घाटावर आयोजित ‘विंग्स ओव्हर गंगेस’ या भव्य एअरशोचा रविवार, २५ ऑक्टोबर रोजी समारोप झाला. गंगेच्या तीरावर लढाऊ विमानांच्या गर्जना आणि आकाशातील चित्तथरारक कसरतींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमो घाटावर उपस्थित राहून या प्रात्यक्षिकांचा आनंद घेतला. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते.