

Passengers protest at Varanasi Airport after the IndiGo Mumbai-bound flight was delayed following the pilot's refusal to operate the flight due to ill health
esakal
वाराणसी : वाराणसीतील बाबतपूर विमानतळावर गुरुवारी मुंबईकडे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे उड्डाण रखडल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली. प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत संबंधित पायलटने विमान उड्डाण करण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर एअरलाइनकडून बोर्डिंग थांबवण्यात आले. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी विमानतळावर आंदोलन सुरू केले.