
वाराणसी इथं एका मुलीवर २३ जणांनी बलात्कार केल्याच्या प्रकरणाच्या तपासात धक्कादायक खुलासा झालाय. फक्त एक सामूहिक बलात्काराचं प्रकरण न राहता आता त्यातून सेक्स रॅकेटच समोर आलंय. सामूहिक बलात्कार प्रकरणी अटक केलेल्या १२ आरोपींच्या मोबाईलमध्ये तब्बल ५४६ मुलींचे अश्लील व्हिडीओ, फोटो आढळले आहेत. तसंच ज्या मोबाईलमध्ये हे व्हिडीओ आढळलेत त्यावरून ते सहा राज्यात पाठवण्यात आले आहेत. या सगळ्या प्रकरणाचा मास्टरमाइंड अनमोल गुप्ता हा आहे.