

health ranking varanasi number one
sakal
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश आरोग्य विभागाच्या ऑगस्ट २०२६च्या हेल्थ रँकिंग डॅशबोर्डमध्ये वाराणसी जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. जिल्ह्याचा संयुक्त स्कोअर ०.८१ नोंदवण्यात आला असून, जुलैच्या तुलनेत त्यात ३०.६५ टक्क्यांची वाढ झाली आहे. माता-बाल आरोग्य, संस्थात्मक प्रसूती, लसीकरण, टीबी नोटिफिकेशन आणि गर्भवती महिलांच्या एचआयव्ही स्क्रीनिंगसह विविध आरोग्य निर्देशांकांवर जिल्ह्याच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले.