Mukhtar Ansari: माफिया मुख्तार अन्सारी अवधेश राय खून प्रकरणात दोषी; तब्बल 32 वर्षांनंतर निकाल

3 ऑगस्ट 1991 रोजी अवधेश राय यांची गोळ्या झाडून हत्या केली होती.
Mukhtar Ansari
Mukhtar Ansari

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील एमपी एमएलए कोर्टाने अवधेश राय यांच्या खून प्रकरणात माफिया मुख्तार अन्सारीला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. (Varanasi's MP MLA court convicts jailed mafia Mukhtar Ansari in Awadhesh Rai murder case)

3 ऑगस्ट 1991 रोजी काँग्रेस नेते आणि माजी आमदार अजय राय यांचा भाऊ अवधेश राय यांची वाराणसीतील अजय राय यांच्या घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.(Latest Marathi News)

Mukhtar Ansari
Adar Poonawalla: मुंबई उच्च न्यायालयाकडून अदार पूनावालांना दिलासा, सोशल मीडिया पोस्टवर घातली बंदी

सोमवारी न्यायालयाने मुख्तार अन्सारी याला अवधेश राय खून प्रकरणात दोषी ठरवले. मुख्तार अन्सारी याला न्यायालय दुपारच्या जेवणानंतर शिक्षा सुनावणार आहे. या प्रकरणात मुख्तार अन्सारीसह पाच जण आरोपी आहेत. (Latest Marathi News)

Mukhtar Ansari
Odisha Train Accident: ओडिसा दुर्घटनेनंतर तब्बल 51 तासांनंतर पहिली ट्रेन रवाना; रेल्वेमंत्र्यांनी हात जोडले अन् ...

ही घटना कुठे घडली?

वाराणसीतील चेतगंज पोलीस स्टेशन हद्दीतील लहुराबीर परिसरात काँग्रेस नेते अवधेश राय यांची हत्या करण्यात आली होती. त्यादिवशी सकाळी हलक्या सरी कोसळत होत्या. मारुती व्हॅनमधून अवधेश राय यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यामध्ये ते जखमी झाले, त्यानंतर त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्यांचा मृत्यू झाला.(Latest Marathi News)

या हत्याकांडानंतर माजी आमदार अजय राय यांनी माजी आमदार अब्दुल कलाम यांच्यासह मुख्तार अन्सारी, भीम सिंह, कमलेश सिंह, राकेश यांच्याविरोधात चेतगंज पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला. मात्र, नामांकित पाच आरोपींपैकी अब्दुल आणि कमलेश यांचा मृत्यू झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com