भाजप आमदाराचा वरुण गांधींवर हल्ला; ‘छोटा राहुल’ म्हणत दिला हा सल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

varun gandhi

भाजप आमदाराचा वरुण गांधींवर हल्ला; ‘छोटा राहुल’ म्हणत दिला हा सल्ला

भाजप नेते वरुण गांधी (varun gandhi) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, भाजप आमदार रमेश मेंडोला यांनी वरुण गांधी यांना ‘छोटा राहुल’ म्हटले आहे. धाकटे राहुल आणि मोठे उद्धव यांच्यासोबत जाण्यापेक्षा चांगले काय असू शकते. तसेही दोघांची मानसिकता सारखीच आहे, असे ट्विटमध्ये वरुण गांधींवर हल्ला करताना मंडोला यांनी लिहिले.

भाजप नेते वरुण गांधी (varun gandhi) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांची बुधवारी भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे चार तास चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमधील प्रदीर्घ संभाषणामुळे वरुण गांधी शिवसेनेत जाणार का? या अटकळांना जोर आला आहे. दरम्यान, इंदूरमधील भाजप आमदार रमेश मेंडोला यांनी त्यांच्याच पक्षाचे लोकसभा खासदार वरुण गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ‘छोटा राहुल’ म्हणत वरुण गांधींवर हल्ला केला.

शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजपवर नाराज असलेले वरुण गांधी यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तीन तास चर्चा झाली. वरुण गांधी यांना संजय राऊत यांनी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी डिनरसाठी आमंत्रित केले होते. दोन्ही नेत्यांमध्ये काय संभाषण झाले, हे अद्याप समजू शकलेले नाही. वरुण गांधी (varun gandhi) हे अनेक दिवसांपासून भाजपवर नाराज आहेत आणि पक्षानेही त्यांना बाजूला केले आहे.

Web Title: Varun Gandhi Sanjay Raut Meet Together Politics

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Sanjay Rautvarun gandhi