

Anil Agarwal On Son Loss And Giving Back To Society
Esakal
वेदांता उद्योग समुहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांचा मुलगा अग्निवेश अग्रवाल यांचं निधन झालं. ४९ वर्षीय अग्निवेश न्यूयॉर्कला गेले असताना कार्डियाक अरेस्टमुळे त्यांची प्राणज्योत मालवली. मुलाच्या अकाली निधनामुळे अनिल अग्रवाल यांना मोठा धक्का बसला आहे. मुलाला असा खांदा देण्याची वेळ यावी यापेक्षा काय वाईट असू शकतं असं म्हणत त्यांनी भावना व्यक्त केल्या.