जास्त ऑफर देऊनही वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये का गेला? उदय सामंत यांनी दिलं स्पष्टीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uday samant

जास्त ऑफर देऊनही वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये का गेला? उदय सामंत यांनी दिलं स्पष्टीकरण

फॉक्सकॉन वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यामुळे राज्यात राजकारण तापल्याचे पाहिला मिळत आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना महाविकास आघाडीवर जोरदार टिका केली आहे. हा प्रकल्प राज्याबाहेर जाण्यामागे महाविकास आघाडी जबाबदार असल्याचे म्हणाले आहेत. ते म्हणाले ही कंपनी महाराष्ट्रात येण्यासाठी गेले आठ महिने प्रयत्न करत होती परंतु आधीच्या सरकारने त्यांना योग्य प्रतिसाद दिला नाही.

"म्हणाले की राज्यात चांगल काय झालं तर ते त्यांच्या मुळे झालं, आणि वाईट काय झालं तर शिंदे- फडणवीस सरकारमुळे होत, राजकारणातील आशा वाईट प्रवृत्तीचा मी निषेध करतो" असं म्हणत त्यांनी टिका केली आहे. पुढे म्हणाले की स्वा;ता फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्या नंतर अजून काही या प्रकल्पाला देता येईल का,

या संदर्भात अनेक बैठका त्यांनी घेतल्या, आणि फडणवीस अनिल अग्रवाल यांच्याशीही बोलले होते. त्यांनी अग्रवाल यांना प्रकल्पासाठी लगेल तेवढी मदत करण्याचे अश्वासन दिला होतो. परंतु मागिल 7-8 महिन्यात आलेल्या अनुभवामुळे कदाचीत त्यांनी हा निर्णय घेतला असावा, असं उदय सामंत यांनी सांगितले.

हेही वाचा: फॉक्सकॉन गेला, रिफायनरीला तरी खोडा घालू नका - उदय सामंत

सामंत पुढं म्हणाले की "हा प्रकल्प गेला, परंतु राजापुर रिफाइनरी प्रकल्पाचं काय?, एकीकडे स्थानिक आमदार समर्थन करतात, तर खासदार मात्र विरोध करतात. यावर एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदी यांच्या सोबत याविषयावर चर्चा केली आहे. मोदींनी महाराष्ट्रातील लोकांना विश्वास दिला आहे. की पुढील काही दिवसातच महाराष्ट्राला नविन आणि या प्रकल्पा पेक्षा मोठा, किवा या प्रकल्पा येवढाच प्रकल्प मिळवून देणार आहे. दरम्यान हा प्रकल्प गुजरातला जाण्यामागची कारणे लवकरच पत्रकार परिषद घेवून महाराष्ट्रा समोर मांडणार आहे. असं सामंत म्हणाले.

Web Title: Vedanta Project Gujarat Despite Higher Offers Uday Samant Explained

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..