
तिरुअनंतपुरम- केरळच्या (Kerala ) संभाव्य मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याने आरोग्य मंत्री के. के. शैलजा ( KK Shailaja) यांचीही वर्णी लागलेली नाही. राज्यात आरोग्य क्षेत्रात चांगले काम केलेल्या शैलजा यांचा नव्या मंत्रिमंडळात समावेश करावा अशी मागणी व त्यासाठी जोरदार प्रचार सोशल मीडियावर सुरू झाला आहे. मात्र के. के. शैलजा यांना वगळण्याचा निर्णय हा पक्षाचा राजकीय व संघटनात्मक निर्णय असून त्यावर पुन्हा विचार होणार नाही, असे सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षा (माकप)ने बुधवारी स्पष्ट केले. (Veena George May Get Kerala Health Ministry Held By KK Shailaja)
के. के. शैलजा यांच्याऐवजी वीना जॉर्ज यांना (Veena George) आरोग्यमंत्री म्हणून संधी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. वीना जॉर्ज या राजकारणात येण्यापूर्वी पत्रकार होत्या, त्यांनी 2016 मध्ये पथनमथिट्टा (Pathanamthitta) जिल्ह्यातील अरनमुला Aranmula मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली आणि त्या विजयी झाल्या. 2021 मध्ये त्या याच मंतदारसंघातून पुन्हा निवडून आल्या आहेत.
‘माकप’ने मंगळवारी (ता. १८) जाहीर केलेल्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीत के. के. शैलजा यांचे नाव समाविष्ट केले नाही. यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यांना मंत्रिमंडळात घ्यावे, यासाठी सोशल मीडियावर चळवळच सुरू झाली आहे. पण पक्ष त्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी पक्षाने घेतलेल्या निर्णयाबद्दल पक्षनेतृत्वाने आधीच स्पष्टीकरण दिले आहे, असे ‘माकप’चे राज्याचे प्रभारी सचिव ए. विजयराघवन यांनी सांगितले. ‘शैलजा टिचर यांना परत आणा’, या सोशल मीडियावर सुरू झालेल्या ट्रेंडबद्दल विचारले असता याबद्दल काही माहीत नसल्याचे सांगत कम्युनिस्ट पक्षाच्या धोरणात राजकारण आणि संघटना यांना समान महत्त्व आहे आणि हा निर्णय त्याआधारेच घेण्यात आला आहे. सत्ताधारी पक्ष या नात्याने राज्याच्या हिताकडेही लक्ष देणे महत्त्वाचे असल्याने पक्षाचा हा निर्णय विचारपूर्वक असल्याचे ते म्हणाले.
पिनराई यांच्यासाठीच नव्या चेहऱ्यांचा घाट
मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यानंतर केरळमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षात के. के. शैलजा यांचे दुसरे स्थान आहे. निवडणुकीपूर्वी संभाव्य मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाची चर्चा होती. मंत्र्यांची नावे निश्चित करण्यासाठी ‘माकप’च्या राज्य समितीच्या मंगळवारी (ता. १८) झालेल्या अंतिम बैठकीत शैलजा यांनी मंत्रिपदी कायम ठेवावे, या प्रस्तावाला ८८पैकी केवळ सात सदस्यांनी समर्थन दिले होते. माध्यमांनी त्यांचा गौरव केला असला तरी पक्षात मात्र त्या फारशा लोकप्रिय नाही. मुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्या रूपाने विजयन यांच्या आव्हान उभे राहू नये म्हणून नव्या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना स्थान देण्याबाबत आधीपासूनच चर्चा झाली होती. निवडणुकीत ‘माकप’ला मोठा विजय मिळाल्याने विजयन यांचे महत्त्व आपसूकच वाढले असून मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना स्थान देण्याचा दावा नेत्यांनी केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.