प्रेमासाठी काय पण! प्रियकर शिरला 'विरू'च्या भुमिकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

utter Pradesh

प्रेमासाठी काय पण! प्रियकर शिरला 'विरू'च्या भुमिकेत

उत्तर प्रदेश मधील लखीमपूर खेरी येथे 'शोले' या बॉलिवूड चित्रपटातील धर्मेंद्रचा खऱ्या आयुष्यातील सीन पाहायला मिळाला आहे. एक तरून प्रेयसीच्या घरच्यांची समजूत काढण्यासाठी थेट पाण्याच्या टाकीवर चढला. त्यानंतर प्रेयसीला सोबत घेवून जाण्याची मागणी करू लागला. या आशिक ची कृती पाहून अख्ख गाव टाकी खाली जमा झाल. गावकऱ्यांनी समजुत काढण्याचा प्रयत्न केला पण हा युवक कोणाच, ऐकण्याच्या मनस्थीतीत नव्हता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारीही तेथे पोहोचले. खूप प्रयत्नानंतर मुलाला समजावुन शांत केले आणि सुखरूप खाली आणले.

ही घटना उत्तर प्रदेशातील पालिया तहसील .या गावातील असल्याचे सांगीतले जात आहे. तर अमन नावाचा मुलगा मुजफ्फरनगरचा रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. त्याची प्रियसी पालिया येथे राहते, ही प्रेयसी दुसऱ्या समाजाची आहे, त्यामुळे हे नाते तिच्या कुटुंबीयांना मान्य नव्हते. वास्तविक, अमनचीला ही मुलगी दिल्लीत भेटली होती. इथे दोघे चॉकलेट बनवण्याच्या कंपनीत एकत्र काम करायचे. आधी यांची मैत्री झाली दोघांमध्ये जवळीक वाढली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.

हेही वाचा: पार्थ चटर्जीला चप्पल मारणारी बाई म्हणते, "फक्त एकाच गोष्टीचा पश्चाताप"

काही दिवसांपूर्वी प्रेयसी नोकरी सोडून कुटुंबीयांसह लखीमपूर खेरी येथे गेली. त्याचवेळी प्रियकर अमनही नोकरी सोडून मुझफ्फरनगरला गेला. या नंतर यांच्या मध्ये रोज फोन वरून संवाद व्हायचा पण प्रेमाने अमनला इतकं पछाडलं होतं की प्रियसीला मिळवण्यासाठी तो लखीमपूर खेरीला मुलीच्या घरी पोहोचला.

त्या नंतर त्याने प्रेयसीच्या घरच्यांना लग्नासाठी मगणी घातली पण घरच्यांनी होकार न दिल्याने, हा थेट टाकीवरच चढला सुमारे २ तास अमन टँकरवर चढून नाटक करत राहिला. त्या नंतर मुलीच्या आईने त्यांच्या लग्नासाठी परवानगी दिली. पण युवकाने हे सगळ लिहून मागीतल आणि लिहून दिल्या नंतर युवक खाली उतरला नंतर पोलीसांनी त्याला अटक करून पोलीस स्टेशन मध्ये घेवून गेले.

Web Title: Veeru Climbed Directly Tank

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..