
पार्थ चटर्जीला चप्पल मारणारी बाई म्हणते, "फक्त एकाच गोष्टीचा पश्चाताप"
पश्चिम बंगाल मध्ये शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी अटके असलेले माजी शिक्षण मंत्री पार्थ चाटर्जी यांच्या वर एका महिलेने चप्पल फेकल्याची एक घटना समोर आली आहे.ही घटना मंगळवारी पार्थ चाटर्जी यांना हॉस्पिटल मध्ये प्राथमिक तपासणी साठी घेवून जाताना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पार्थ चॅटर्जीवर चप्पल फेकणाऱ्या महिलेचे नाव शुभ्रा घारुई असल्याचे सांगण्यात येत आहे. ती अममतला येथील रहिवासी आहे.
छापेमारीत जप्त केलेले पैसे माझे नाहीत. माझ्या विरोधात कोणीतरी षडयंत्र रचतले आहे. अस चॅटर्जी म्हणाले , याआधी पार्थ चॅटर्जीची सहकारी अर्पिता मुखर्जी हिने ही रोकड पार्थ चॅटर्जीची असल्याचे सांगितले होते. परंतु या दोघांनीही नकार दिल्यानंतर आता छाप्यात सापडलेली रोकड कोणाची आहे, हा मोठा प्रश्न केंद्रीय यंत्रणेसमोर आहे.
कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केंद्रीय अन्वेषण यंत्रणा (CBI), पश्चिम बंगाल शिक्षण सेवा आयोगाच्या शिफारशींवर गट-सी आणि डी कर्मचारी तसेच शिक्षकांच्या भरतीतील अनियमिततेची चौकशी करत आहे. ईडी ह्या घोटाळ्यात सहभागी असलेल्यांचा शोध घेत आहे.
CBI ने पार्थ चॅटर्जी यांच्या संबंधीत 17 ठिकाणी छापामारी केली आहे, CBI अजून डझनहून अधिक नवीन ठिकाणी छापे टाकण्याची तयारी सुरू आहे. चॅटर्जी यांच्या 22 जुलै ला डायमंड सिटी मधील फ्लॉट वर छापा मारला,27 जुलै ला बेलघोरिया मधील 2 फ्लॉट मध्ये छापा मारला, 28 जुलै ला चिनार पार्क मध्ये देखील छापा मारला आहे.
आत्ता पर्यंत अर्पिता मुखर्जी यांच्या देखील 4 फ्लॉट वर ED ने छापे टाकले आहेत. यामध्ये पहिल्या छाप्यांत 22 कोटी रूपये आणि 70 लाख रूपयांचे सोने सापडले, तर दुसऱ्या छाप्यांत 28 कोटी आणि 4 कोटी रूपयांचे सोने जप्त केले आहे.
हेही वाचा: ईडीनेच माझ्या फ्लॅटमध्ये पैसे ठेवले! अर्पिता चॅटर्जीचा गंभीर आरोप
अर्पिता मुखर्जीच्या घरातून ईडीने नोटांचा साठा जप्त केला आहे. त्यानंतर तपासाला वेग आला तेव्हा एजन्सीला अर्पिताच्या आलिशान कारची ही माहिती मिळाली. ईडीने 23 जुलै रोजी पहिल्यांदा अर्पिताच्या फ्लॅटवर छापा टाकला होता. यादरम्यान ईडीला सुमारे 21 कोटी रुपये मिळाले.
एवढेच नाही तर ईडीने अर्पिताच्या घरातून 20 मोबाईल आणि 50 लाख रुपयांचे दागिणेही जप्त केले आहेत. अर्पिताच्या घरातून ईडीला सुमारे ६० लाखांचे विदेशी चलनही मिळाले होते. यानंतर ईडीने अर्पिता मुखर्जीला अटक केली.
Web Title: Lady Slapped Partha Chatterjee Says Only One Regret
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..