ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते कादर खान यांचे निधन

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 जानेवारी 2019

कादर खान काही वर्षांपासून मुलगा आणि सुनेसोबत कॅनडात वास्तव्याला होते. श्‍वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना न्युमोनिया झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले होते. कादर खान यांच्या गुडघ्यावर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली होती.

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते व लेखक कादर खान (वय 81) यांचे कॅनडातील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. 

श्‍वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे कॅनडातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर त्यांची प्राणज्योत मालविली. कादर खान यांच्या निधनाचीही सोमवारी अफवा होती. पण, त्यांचा मुलगा सरफराज याने हे वृत्त फेटाळले होते. अखेर आज त्यांचे निधन झाले.

कादर खान काही वर्षांपासून मुलगा आणि सुनेसोबत कॅनडात वास्तव्याला होते. श्‍वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना न्युमोनिया झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले होते. कादर खान यांच्या गुडघ्यावर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली होती.

कादर खान यांनी  "दाग' या चित्रपटापासून अभिनयाला सुरवात केली होती. 'कुली', "होशियार', "हत्या' आदी चित्रपटांचे त्यांनी लेखन केले असून, 300 हून अधिक चित्रपटांत त्यांनी भूमिका साकारल्या होत्या.

Web Title: Veteran Bollywood actor Kadar Khan passed away at 81