Vice President Election: उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी होणाऱ्या निवडणुकीत कोण-कोण करणार मतदान? यादी झाली तयार!

Election Commission on Vice President Election: आयोगाच्या तयारी पाहता निवडणुकीची घोषणा आता कधीही होऊ शकते असे मानले जात आहे.
Election Commission India
Election Commission IndiaSakal
Updated on

Overview of the Vice Presidential Election 2025: उपराष्ट्रपतींसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाग घेणाऱ्यांची यादी अंतिम करत, निवडणूक आयोगाने गुरुवारी लवकरच उपराष्ट्रपती पदाचा निवडणूक कार्यक्रम घोषित केला जाईल, अशी माहिती दिली. निवडणूक कार्यक्रमाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडून ही यादी उपलब्ध करून दिली जाईल, असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

आयोगाच्या तयारी पाहता निवडणुकीच घोषणा आता कधीही होऊ शकते असे मानले जात आहे. निवडणूक आयोगाच्या मते, लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य उपराष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीत भाग घेतात. नियमांनुसार, प्रत्येकाच्या मताचे मूल्य सारखेच असते. ही यादी संबंधित सभागृहांच्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या वर्णक्रमानुसार तयार करण्यात आली आहे.

उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी तयार केलेल्या यादीत एकूण ७८२ सदस्य आहेत. यापैकी ५४२ सदस्य लोकसभेचे आहेत, तर २४० सदस्य राज्यसभेचे आहेत. अशा परिस्थितीत, ३९४ सदस्यांचा पाठिंबा असलेली व्यक्तीच उपराष्ट्रपती पदावर निवडली जाईल. तर एनडीएकडे दोन्ही सभागृहात ४२२ सदस्यांचे बहुमत आहे.

Election Commission India
Modi Cabinet Decisions: मोदी सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले मोठे निर्णय; अश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती!

यापैकी लोकसभेत २९३ सदस्य आहेत, तर राज्यसभेत १२९ सदस्य आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की लोकसभेत एकूण सदस्यांची संख्या ५४३ असली तरी, बंगालच्या बसीरहाट लोकसभा जागेच्या रिक्ततेमुळे, सध्या लोकसभेत एकूण सदस्यांची संख्या ५४२ आहे, तर राज्यसभेत एकूण सदस्यांची संख्या २४५ आहे, तर सध्याच्या सदस्यांची संख्या फक्त २४० आहे. म्हणजेच, पाच जागा अजूनही रिक्त आहेत. एकूणच आता उपराष्ट्रपती पदाचा निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होवू शकतो, असं दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com