मोदी-शाह पुन्हा धक्कातंत्र वापरणार; आज उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची करणार घोषणा!

भाजपच्या उपराष्ट्रपतीपदाच्या संभाव्य उमेदवारांत अनेक नेत्यांच्या नावांचा समावेश आहे.
Vice President Election 2022
Vice President Election 2022 esakal
Summary

भाजपच्या उपराष्ट्रपतीपदाच्या संभाव्य उमेदवारांत अनेक नेत्यांच्या नावांचा समावेश आहे.

Vice President Election 2022 : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना उमेदवारी देऊन सर्वांना धक्का देणारी भाजप आज उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करू शकते. आज होणाऱ्या संसदीय मंडळाच्या बैठकीत भाजप उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचं नाव निश्चित करण्याची शक्यता आहे.

या नावावर शिक्कामोर्तब करणार्‍यांमध्ये अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासह इतरांचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप (BJP) सत्ताधारी एनडीए आघाडीतील प्रमुख मित्रपक्षांमधील आपल्या उमेदवाराचं नाव जाहीर करु शकते. विविध पक्षांसोबत निवडणुकीबाबत एकमत घडवून आणण्याचा हा एक मार्ग असेल. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीप्रमाणंच उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही विरोधी पक्ष सामान्य उमेदवार उभा करू शकतात, असं मानलं जातंय.

Vice President Election 2022
केंद्रीय नेतृत्वानं देवेंद्र फडणवीसांचा पोपट केलाय; राऊतांची टीका

भाजपकडं पुरेसं संख्याबळ

  • राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीप्रमाणंच उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही एनडीएच्या उमेदवाराला पुरेसं संख्याबळ असल्याचं मानलं जातंय.

  • याशिवाय, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला काही गैर-काँग्रेस विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळू शकतो.

  • या निवडणुकीत बीजेडी आणि वायएसआर काँग्रेस सारखे पक्षही भाजपला पाठिंबा देऊ शकतात.

Vice President Election 2022
Gautam Adani : बिल गेट्स यांना मागं टाकत गौतम अदानी बनले जगातील चौथे 'श्रीमंत'

'या' नावांची सर्वाधिक चर्चा

भाजपच्या उपराष्ट्रपतीपदाच्या संभाव्य उमेदवारांत अनेक नेत्यांच्या नावांचा समावेश असून, त्यांची निवड पुन्हा एकदा सर्वांना आश्चर्यचकित करू शकते. या नावांमध्ये अल्पसंख्याक कल्याण मंत्रालयाचा नुकताच राजीनामा दिलेल्या मुख्तार अब्बास नक्वी (Mukhtar Abbas Naqvi) यांचं नाव आघाडीवर आहे. यासोबतच केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान (Arif Mohammad Khan) आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांच्यासह पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि नजमा हेपतुल्ला यांचीही नावं चर्चेत आहेत.

Vice President Election 2022
तेलंगणात भाजप खासदाराच्या गाडीवर हल्ला; समर्थक-ग्रामस्थांमध्ये तुफान हाणामारी

6 ऑगस्टला होणार निवडणूक

निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 19 जुलै आहे. 6 ऑगस्ट रोजी निवडणूक होणार आहे. विशेष म्हणजे, देशाचा पुढील उपराष्ट्रपती, जो राज्यसभेचा सभापती देखील असतो, तो संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या (लोकसभा आणि राज्यसभा) सदस्यांद्वारे निवडला जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com