उपराष्ट्रपतिपदासाठी आज मतदान; नायडू-गांधी यांच्यात लढत  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vice president election today, numbers in favour of Venkaiah Naidu

- सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत मतदान; सायंकाळी निकाल अपेक्षित 
- लोकसभा-राज्यसभेचे खासदार मतदार असतात. ही संख्या सध्या 790 आहे. 
- राष्ट्रपतिनियुक्त खासदारांनाही मतदानाचा हक्क. 
- उमेदवारी अर्जावर 20 खासदार अनुमोदक, 20 खासदार सूचक यांच्या सह्या असाव्या लागतात. 
- खासदार प्रेफरन्स पद्धतीच्या आधारावर मतदान करतात. प्रत्येकाच्या मताचे मूल्य एक असते. 
- विजयासाठी उमेदवारास 396 मते लागतात. 

उपराष्ट्रपतिपदासाठी आज मतदान; नायडू-गांधी यांच्यात लढत 

नवी दिल्ली : देशाच्या 15व्या उपराष्ट्रपतींची निवड करण्यासाठी संसद भवनात आज (शनिवार) मतदान होत आहे. या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्रीच्या जेवणाच्या निमित्ताने भाजप आघाडीच्या खासदारांशी संवाद साधून आपले मत वाया जाणार नाही याची काळजी घ्या, असे बजावले. उपराष्ट्रपती डॉ. महंमद हमीद अन्सारी यांचा दहा वर्षांचा कार्यकाळ येत्या दहा ऑगस्टला संपतो आहे. 

उपराष्ट्रपती व राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष या पदांसाठी नायडू व विरोधी पक्षांतर्फे गोपालकृष्ण गांधी हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राज्यसभा सचिवालय या निवडणुकीचे संचालन करते. संसदेतील 790 खासदारांपैकी "एनडीए'कडे किमान साडेचारशे मते आहेत. अण्णा द्रमुक, वायएसआर कॉंग्रेस, तेलंगण राष्ट्र समिती, जेडीयू व इतर मित्रपक्षांची संख्या धरल्यास ही मतसंख्या पाचशेच्या पुढे जाते. त्यामुळे नायडू यांचा विजय निश्‍चित मानला जातो. "एनडीए'कडे सध्या लोकसभेत किमान 337 व राज्यसभेत 81 मते आहेत. राष्ट्रपती निवडणुकीत "पार्लमेंटरी इलेक्‍टोरल कॉलेज'ची म्हणजे खासदारांची किमान 21 मते अवैध ठरल्याने भाजपने ताकही फुंकून पिण्याचे ठरविले आहे. याच दृष्टीने उद्याच्या मतदानाची रंगीत तालीमही खासदारांकडून करवून घेण्यात आली. पक्षाध्यक्ष अमित शहा अद्याप मतदान करू शकत नसले तरी त्यांनीही खासदारांशी संवाद साधला.

मोदींनी सांगितले, की ही निवडणूक आपल्या बाजूने असली तरी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. तुम्हा साऱ्यांनाच उद्या घरी जाण्याची घाई असणार, हे मला माहिती आहे. मात्र मतदान घाईघाईत करू नका. वेंकय्या नायडू यांचेही भाषण झाले. ते म्हणाले, की आपण निवडून आल्यास राज्यघटनेचे मूलभूत तत्त्व व उच्च संसदीय परंपरांचे निष्ठेने पालन करू. आपली उमेदवारी ही संसदीय परंपरांच्या पालनाच्या विचारांची लढाई आहे, असे त्यांनी सांगितले. 

- सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत मतदान; सायंकाळी निकाल अपेक्षित 
- लोकसभा-राज्यसभेचे खासदार मतदार असतात. ही संख्या सध्या 790 आहे. 
- राष्ट्रपतिनियुक्त खासदारांनाही मतदानाचा हक्क. 
- उमेदवारी अर्जावर 20 खासदार अनुमोदक, 20 खासदार सूचक यांच्या सह्या असाव्या लागतात. 
- खासदार प्रेफरन्स पद्धतीच्या आधारावर मतदान करतात. प्रत्येकाच्या मताचे मूल्य एक असते. 
- विजयासाठी उमेदवारास 396 मते लागतात. 

Web Title: Vice President Election Today Numbers Favour Venkaiah Naidu

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..