धर्मनिरपेक्षतेबाबत भारताला शिकवू नये; व्यंकय्या नायडूंनी सुनावलं! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

m venkaiah naidu

धर्मनिरपेक्षतेबाबत भारताला शिकवू नये; व्यंकय्या नायडूंनी सुनावलं!

बंगळूर - इतर देशांना भारताला धर्मनिरपेक्षतेबद्दल शिकवण्याचा अधिकार नाही, विशेषत: जेव्हा अनेक प्रगत राष्ट्रांचे स्वतःचे अंतर्गत संघर्ष आहेत. काही लोकांची इतरांची निंदा करण्याची आणि विचित्र समाधान मिळवण्याची मानसिकता असते. प्रत्येक धर्म आपापल्यापरीने महान आहे. प्रत्येकाने आपल्या देशाचा, भाषेचा आणि धर्माचा अभिमान बाळगावा, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी केले. शहरातील माउंट कार्मेल कॉलेजच्या (एमसीसी) अमृत महोत्सव सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

उपराष्ट्रपती नायडू म्हणाले, किमान प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच शिकवले पाहिजे. कारण विद्यार्थ्यांना समजणे, आकलन करणे आणि संवाद साधणे सोपे होईल. इंग्रजी शिक्षणाशिवाय तुम्ही आयुष्यात उच्चस्तरावर जाऊ शकत नाही, असा चुकीचा समज आहे. मातृभाषेबरोबरच जास्तीत जास्त भाषा शिका. त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. इंग्रजी देखील शिका, कारण ते उच्च शिक्षणासाठी मदत करेल. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी महिलांना सक्षमीकरण धोरणांचा वापर करण्याचे आवाहन केले. हवामान बदल आणि पर्यावरणीय प्रदूषण यांसारख्या जगाच्या सध्याच्या समस्यांशी लढण्यासाठी शिक्षणाद्वारे कोणती भूमिका बजावली जाईल, याबद्दल त्यांनी सांगितले.

Web Title: Vice President M Venkaiah Naidu Benglore

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..