भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी जेजुरी येथे अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सरकारच्या वतीने सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. जखमी वारकऱ्यांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेतली जाईल, अशी हमीही त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्याआधी पहाटे त्यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे दर्शन घेतले असून त्यानंतर ते पुण्याच्या दिशेने रवाना झाले.