VIDEO: जोडप्याचं पॅरासिलिंग सुरु असताना दोरी तुटली अन्... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

VIDEO: जोडप्याचं पॅरासिलिंग सुरु असताना दोरी तुटली अन्...

VIDEO: जोडप्याचं पॅरासिलिंग सुरु असताना दोरी तुटली अन्...

दीव: पॅरासिलिंग (Parasailing) करताना अचानक पॅराशूटची दोरी (parachute rope) तुटल्यामुळे एका जोडप्याला थरारक अनुभवाला सामोरं जावं लागलं. अजित काथड (३०) आणि त्यांची पत्नी सरला (३१) रविवारी दीवच्या नागोवा बीचवर पॅरासिलिंग करताना ही दुर्घटना घडली. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पॅराशूट हवेत उंचावर असताना, अचानक दोरी तुटली आणि हे जोडपं समुद्रात पडलं.

गुजरातमधील हे जोडपं दीवला सुट्टया घालवण्यासाठी गेलं होतं. कुठलीही दुखापत न होता, सुदैवाने हे जोडप या अपघातातून बचावलं. अजित आणि सरला दोघांनी लाईफ जॅकेट घातलं होतं. दोघे समुद्रात पडल्यानंतर किनाऱ्यावर असलेल्या जीवरक्षकांनी त्यांना वाचवलं. दुर्घटनाग्रस्त पॅराशूट पावरबोटला जोडलेलं होतं.

हेही वाचा: दुसऱ्या जातीतल्या मुलाबरोबर लग्न केलं म्हणून पित्याने मुलीवर केला बलात्कार

दोरी तुटल्यानंतर दोघांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरु केला, असं बोटीवर उपस्थित असलेले अजितचे मोठे भाऊ राकेश यांनी सांगितलं. "मी व्हिडीओ शूट करत होतो. दोरी तुटल्यानंतर काय करायचं हे मलाही समजलं नाही, असं त्यांनी सांगितलं. माझा भाऊ आणि वहिनीला उंचावरुन मी समुद्रात पडताना पाहिलं. त्या क्षणाला मी काहीच करु शकत नाही, ही खंत माझ्या मनात होती" असे राकेश म्हणाले. बीचवर असलेल्या जीवरक्षकांनी अखेर अजित आणि सरलाची सुटका केली.

loading image
go to top