esakal | VIDEO : पंजाबचे CM कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासोबत थिरकले फारुक अब्दुल्ला; व्हिडीओची चर्चा

बोलून बातमी शोधा

farooque abdulla}

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला एका जुन्या गाण्यावर थिरकताना दिसून आले.

VIDEO : पंजाबचे CM कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासोबत थिरकले फारुक अब्दुल्ला; व्हिडीओची चर्चा
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

चंदीगढ : राजकीय लोकांना नेहमी एका गंभीर मुद्रेमध्ये वावरतानाच पाहिलं जातं. त्यांच्यावर सातत्याने समाजाचं लक्ष असतं. त्यामुळे त्यांना नेहमी वावरताना काळजी घ्यावी लागते. मात्र, काही क्षण असे असतात जिथे ते अगदी खुलेपणाने वावरताना दिसून येतात. असंच काहीसं चित्र चंदीगढमध्ये पहायला मिळालं आहे.

हेही वाचा - 'मेट्रो मॅन' श्रीधरन यांच्यावरुन केरळ भाजपात गोंधळ; मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीवरुन आता घुमजाव

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला एका जुन्या गाण्यावर थिरकताना दिसून आले. अमरिंदर सिंह यांच्या नातीचं चंदीगढमध्ये लग्न झालं. त्यावेळी या दोघांचा हा दिलखुलास डान्स पहायला मिळाला आहे. या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

चंदीगढमध्ये मोठ्या उत्साहात अमरिंदर सिंह याची मुलगी रनिंदर सिंह यांच्या मुलीचा म्हणजेच सेहरिंदर कौरचा विवाह संपन्न झाला. त्यावेळी केलेल्या डान्सचा हा व्हिडीओ लोकप्रिय ठरला आहे. यामध्ये दिसतंय की, फारुख अब्दुल्ला आणि अमरिंदर सिंह 'आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे' आणि 'गुलाबी आँखे जो तेरी देखी' या गाण्यावर थिरकताना पहायला मिळत आहेत. ही दोन्हीही गाणी मोहम्मद रफी या सुप्रसिद्ध गायकाने 60-70 च्या दशकामध्ये गायली होती. कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या नातीचा विवाह रविवारी आदित्य नारंगसोबत झाला.