esakal | 'मेट्रो मॅन' श्रीधरन यांच्यावरुन केरळ भाजपात गोंधळ; मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीवरुन आता घुमजाव
sakal

बोलून बातमी शोधा

e shridharan

केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांनी काल केलेल्या आपल्या घोषणेवरुन माघार घेतली आहे. 

'मेट्रो मॅन' श्रीधरन यांच्यावरुन केरळ भाजपात गोंधळ; मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीवरुन आता घुमजाव

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

तिरुवनंतपूरम: 'मेट्रो मॅन' म्हणून प्रसिद्ध असणारे ई. श्रीधरन भारतीय जनता पक्षाकडून केरळच्या मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असणार आहेत, अशी घोषणा भाजपाकडून करण्यात आली होती. मात्र, आता या घोषणेवरुन भाजपने घुमजाव केला आहे. केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांनी काल केलेल्या आपल्या घोषणेवरुन माघार घेतली आहे. 

हेही वाचा - West Bengal Election : अमित शहांच्या उपस्थितीत बैठक; नवे चेहरे आणण्याची भाजपची रणनीती

मुरलीधरन यांनी ट्विट करत म्हटलं होतं की, केरळ भाजप विधानसभेच्या निवडणुका ई. श्रीधरन यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहे. ते मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील. आम्ही CPIM आणि काँग्रेस दोन्ही पक्षांना पराभूत करुन एक भ्रष्टाचारमुक्त, विकासोन्मुख आणि लोकाभिमुख सरकार प्रस्थापित करु. केरळ भाजपचे प्रमुख के सुंदरन यांच्या वक्तव्यानंतर हे ट्विट त्यांनी केलं होतं. मात्र, काही तासानंतरच मुरलीधरन यांनी आपलं ट्विटमधील वक्तव्य मागे घेत ते डिलीट केलं आहे. त्यांनी एएनआयशी बोलताना म्हटलंय की, मी जे काही वक्तव्य केलं ते माध्यमातील माहितीच्या आधारावर होतं मात्र, जेंव्हा मी पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा केली तेंव्हा मला समजलं की अशाप्रकारचा कसलाही निर्णय जाहीर करण्यात आला नाहीये. 

ई. श्रीधरन दोन आठवड्यांपूर्वीच भाजपमध्ये सामील झाले होते. त्यांची प्रतिमा एक स्वच्छ चारित्र्याच्या अधिकारी म्हणून राहिली आहे. 140 सदस्यीय केरळ विधानसभेच्या येत्या 6 एप्रिलपासून निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीची मतमोजणी 2 मे 2021 रोजी होईल. केरळ भाजपचे प्रमुख के. सुंदरन्  यांनी मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून भाजपकडून ई. श्रीधरन् यांच्या नावाची घोषणा केली होती. त्याला केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांनीही दुजोरा दिला होता. मात्र, आता पक्षातच याबाबत गोंधळ असल्याचं स्पष्ट होतंय.  दिल्लीमध्ये मेट्रो ट्रेन सुरु करण्याचे श्रेय ई. श्रीधरन यांनाच जातं. देशात फ्रँट कॉरिडॉर सुरु करण्याचे श्रेय त्यांनाच जातं. याशिवाय त्यांनी कोच्ची मेट्रो आणि लखनऊ मेट्रो प्रोजेक्टचंही काम केलं आहे.  88 वर्षीय ई. श्रीधरन 1995 पासून 2012 पर्यंत दिल्ली मेट्रोचे मॅनेजिंग डायरेक्टर राहिलेले आहेत. ते माता वैष्णो देवी तीर्थ ट्रस्टचे सदस्य देखील आहेत.  यांना 2001 मध्ये पद्म आणि 2008 मध्ये पद्म विभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. अमेरिकेतील जगप्रसिद्ध टाइम मॅगझीनने त्यांना एशिया हीरो म्हणून देखील नावाजलं आहे. केरळच्या पलक्कडमध्ये श्रीधरन यांचा जन्म 12 जून 1932 रोजी झाला. त्यांनी आंध्र प्रदेशातील काकीनाडामधून सिव्हील इंजिनिअरिंगची डिग्री प्राप्त केली आहे. त्यानंतर ते भारतीय रेल्वे सेवेमध्ये आले. 

loading image