esakal | 'कोरोना से डर नही लगता साहब..'; तरुणाने दाखवली कोविड सेंटरची दुरावस्था

बोलून बातमी शोधा

'कोरोना से डर नही लगता साहब..'; तरुणाने दाखवली कोविड सेंटरची दुरावस्था
'कोरोना से डर नही लगता साहब..'; तरुणाने दाखवली कोविड सेंटरची दुरावस्था
sakal_logo
By
शर्वरी जोशी

कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे प्रत्येक जण भयभीत झाला आहे. कोणत्याही क्षणी कोरोना आपल्याला गाठेल ही एकच भीती सध्या अनेकांच्या मनात आहे. मात्र, छिंदवाडा येथील एका रुग्णाला कोरोनाची भीती वाटत नसून चक्क छताला असलेल्या फॅनची भीती वाटत आहे. सध्या या रुग्णाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चिला जात आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ छिंदवाडा येथील जिल्हा रुग्णालयातील आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण कोविड वॉर्डमध्ये भरती असून त्याने पंख्याची भीती असल्याचं म्हटलं आहे. माझ्या बेडवर असलेला पंखा कोणत्याही क्षणी कोसळेल असं या तरुणाने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. विशेष म्हणजे त्याच्या या व्हिडीओनंतर कोविड वॉर्डमधील सत्य परिस्थिती समोर आली आहे.

"कोरोना से डर नहीं लगता साहब, इस पंखे से डर लग रहा हैं! रात्रभर झोप लागत नाही. कधीही हा पंखा अंगावर पडू शकतो ही एकच भीती सतत मनात असते. याविषयी अनेकदा मी रुग्णालयातील स्टाफ व परिचारिकांकडे तक्रार केली. तसंच हा पंखा बदलण्याची विनंतीही केली. जर पंखा बदलणं शक्य नसेल तर निदान मला दुसऱ्या जागी शिफ्ट करा असंदेखील मी वारंवार सांगितलं. मात्र, कोणीही माझं म्हणणं ऐकून घेत नाहीये," असं हा व्यक्ती व्हिडीओमध्ये सांगत आहे.

दरम्यान, ज्या कोविड रुग्णालयात या तरुणावर उपचार सुरु आहेत. त्या रुग्णालयाचं बांधकाम दोन वर्षांपूर्वीच करण्यात आलं आहे. त्यामुळे केवळ २ वर्षांमध्येच येथे अशा समस्या निर्माण झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.