esakal | मनमौजी राहुल गांधी; केरळमधील मच्छिमारांसोबत घेतली समुद्रात उडी!

बोलून बातमी शोधा

मनमौजी राहुल गांधी; केरळमधील मच्छिमारांसोबत घेतली समुद्रात उडी!}

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विविध उपक्रमात घेतलेल्या सहभागाचे व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल झाले आहेत. असाच आणखी एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे.

मनमौजी राहुल गांधी; केरळमधील मच्छिमारांसोबत घेतली समुद्रात उडी!
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विविध उपक्रमात घेतलेल्या सहभागाचे व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल झाले आहेत. असाच आणखी एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे. यामध्ये ते काही मच्छिमारांसोबत समुद्रात पोहताना दिसत आहे. केरळमधील कोलम जिल्ह्यातील हा व्हिडिओ असून आगामी काळात येथे निवडणुका होणार असल्याने ते स्थानिकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. 

राहुल गांधी यांनी बुधवारी कोलम येथील मच्छिमारांसोबत दिवस घालवला. त्यांच्यासोबत समुद्रात जाळे टाकून मासे पकडण्याचा तसेच समुद्राच्या पाण्यात उडी घेत पोहण्याचा आनंदही त्यांनी लुटला. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी किमान १० मिनिटे मच्छिमारांसोबत पोहण्याचा आनंद लुटला. 

पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी समुद्रात बोटीतून निघाले असताना काही मच्छिमार त्यांना समुद्रात जाळे टाकताना दिसले त्यानंतर लगेचच त्यांनी देखील समुद्रात उडी घेतली. यावेळी एका मच्छिमारानं सांगितलं की, "मच्छिमार सहकारी मासे पकडण्यासाठी पाण्याखाली जाळं जाळं टाकत असताना राहुल गांधी यांनी देखील समुद्रात उडी घेतली." जलक्रिडेनंतर स्थानिक मच्छिमारांनी बोटीवरच तयार केलेल्या फिश करी आणि ब्रेडवर राहुल गांधी यांनी ताव मारला.

या दौऱ्यावर राहुल गांधींसोबत काँग्रेसचे इतर चार नेते देखील होते. यामध्ये काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि टी. एन. प्रथमपन यांचा समावेश होता. ज्या कोलम जिल्ह्यात राहुल गांधींनी मच्छिमारांसोबत दिवस घालवला त्या जिल्ह्यात येत्या काही महिन्यांमध्ये स्थानिक निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी स्पष्ट केले की काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मच्छिमारांच्या गरजांचा समावेश करण्यात येईल.  

सत्ताधारी डाव्या पक्षावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, "सरकारने ट्रॉवलर्स बांधण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे मच्छिमारांच्या रोजीरोटीवर परिणाम होणार आहे. मी तुमच्या कामाचा सन्मान करतो कारण आपण मासे खातो मात्र त्यामागे किती मेहनत असते हे आपल्याला कळत नाही"