esakal | Video: पोलिसांनी केलेल्या बेदम धुलाईचा व्हिडीओ झाला व्हायरल; 2 महिन्यांनी केलं सस्पेंड
sakal

बोलून बातमी शोधा

muzzafarnagar

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील पोलिस कर्मचाऱ्याद्वारे एका युवकाला थर्ड डिग्री देतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Video: पोलिसांनी केलेल्या बेदम धुलाईचा व्हिडीओ झाला व्हायरल; 2 महिन्यांनी केलं सस्पेंड

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुझफ्फरनगर : उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील पोलिस कर्मचाऱ्याद्वारे एका युवकाला थर्ड डिग्री देतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधीक्षकाने एका सब इन्स्पेक्टर सहित दोन पोलिस कर्मचाऱ्यांना सस्पेंड केलं आहे. मात्र, भीतीच्या सावटाखाली असलेला पीडितेचा परिवार यावर अधिक बोलू इच्छित नाहीये. 

ही घटना मुझफ्फरनगर जिल्ह्यातील शाहपुर ठाणे क्षेत्रातील हरसौली चौकीतील आहे. या चौकीत पोलिस कर्मचाऱ्यांकडून चाउमिनचा गाडा लावणाऱ्या मोमिनला अत्यंत निर्दयीपणे मारण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओच्या आधारेच त्या पोलिसावर कारवाई करत एसएसपी अभिषेक यादव यांनी सब इन्स्पेक्टर आणि शिपायाला सस्पेंड केलं आहे. पोलिसांचं असं म्हणणं आहे की, भावा-बहिणींच्या वादानंतर या युवकाला पोलिसांनी चौकीमध्ये आणलं होतं. त्यानंतर त्याला बेदम मारण्यात आलं होतं. 

हेही वाचा - 'स्वदेशी ट्विटर' Koo ने 10 महिन्यांत जमवले 41 लाख डॉलर; PM मोदींनी नावाजलेले नवं ऍप

पोलिसांद्वारे चौकीच्या आत या युवकाला अत्यंत निष्ठूरपणे मारतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर 2 महिन्यांनंतर व्हायरल झाला आहे. त्यानंतर या पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई करत त्यांना सस्पेंड करण्यात आलं आहे. या प्रकरणाचा अधिक तपास करण्याचे आदेश अतुल श्रीवास्तव यांना देण्यात आले आहेत.