
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 'मन की बात'मध्ये याचा विशेष उल्लेख देखील केला होता.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी जुलैमध्ये आत्मनिर्भर भारत ऍप इनोव्हेशन चँलेज लाँच केलं होतं. आधीपासूनच अस्तित्वात असणाऱ्या ऍप्सना जागतिक स्तरावर भारतीय पर्याय म्हणून तयार होण्याची क्षमता असणाऱ्या ऍप्ससाठी हे चँलेज होतं. अटल इनोव्हेशन मिशनच्या अंतर्गत 8 कॅटेगरींमध्ये या आत्मनिर्भर भारत ऍप इनोव्हेशन चँलेंजचा समावेश होता. यामध्ये एक कॅटेगरी सोशल नेटवर्कींग ऍपची होती. या कॅटेगरीमध्ये अप्रमेय राधाकृष्णा नावाच्या एका युवकांने Koo नावाच्या मायक्रॉब्लॉगिंग स्टार्टअपच्या द्वारे ही स्पर्धा जिंकली होती. तेंव्हापासून फक्त 10 महिन्यांच्या आतच या मायक्रॉब्लॉगिंग स्टार्टअप Koo ने 41 लाख डॉलर अर्थात 29.84 रुपयांचा फंड जमा केला आहे. 10 महिन्यांच्या आत 30 कोटी रुपये जमवणे ही मोठी गोष्ट आहे. स्वदेशी मायक्रॉब्लॉगिंग स्टार्टअप Koo या भांडवलासह आपली क्षमता आणि पोहोच आणखी वाढवेल. कंपनीच्या द्वारे जाहीर केलेल्या वक्तव्यानुसार, येणारी आव्हाने आणि ऍपबाबत आणखी जागरुकता वाढवण्यासाठी या फंडचा वापर केला जाईल.
हेही वाचा - राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक, काँग्रेसच्या नेत्याविषयी बोलताना अश्रू अनावर
कोणत्या गुंतवणुकदारांद्वारे फंड जमवला?
मिळालेल्या माहितीनुसार, कू ने 2984 कोटींचा हा फंड अर्ली स्टेड व्हेंचर कॅपिटल फर्म 3one4 Capital, Accel Partners, Kalaari Capital, Blume Ventures आणि Dream Incubator सारख्या गुंतवणुकदारांकडून गोळा केले आहेत. 3one4 कॅपिटलच्या गुंतवणूकदारांमध्ये माजी सिनीयर एक्झीक्यूटीव्ह मोहनदास पई देखील आहेत. 2020 साठी गूगल प्लेस्टोअरच्या सर्वश्रेष्ठ आवश्यक ऍपचा पुरस्कार देखील मिळाला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बातमध्ये याचा विशेष उल्लेख देखील केला होता.
Koo ऍपची खासियत काय आहे
राधाकृष्ण यांच्या म्हणण्यानुसार, इतर मायक्रॉब्लॉगिंग ऍपवर इंग्रजीव्यतिरिक्त मातृभाषा असणाऱ्यांना फारसा वाव नाही मात्र, Koo ऍपवर भारतीय भाषांमध्ये विचार मांडण्याची संधी मिळते. त्यांचं म्हणणं आहे की, Koo येणाऱ्या काळात भारतीयांच्या आवाजाला एक आयाम देईल.