esakal | प्रियांका गांधी यांचा आजपासून आसाम दौरा; कामाख्याच्या दर्शनाने करणार प्रचाराचा आरंभ

बोलून बातमी शोधा

priyanka-gandhi}

नरेंद्र मोदी यांनी सलग तीन वेळा आसाम दौरा केल्यानंतर प्रियांका यांच्या दौऱ्यामुळे विरोधकांच्या मोहिमेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. दोन दिवसांच्या दौऱ्यात प्रियांका लखीमपूर येथून प्रचार सुरु करतील.

प्रियांका गांधी यांचा आजपासून आसाम दौरा; कामाख्याच्या दर्शनाने करणार प्रचाराचा आरंभ
sakal_logo
By
वृत्तसंस्था

गुवाहाटी - काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी सोमवारी कामाख्या देवीचे दर्शन घेतील आणि आसाम विधानसभा निवडणूकीसाठी प्रचाराचा आरंभ करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तीन वेळा आसाम दौरा केल्यानंतर प्रियांका यांच्या दौऱ्यामुळे विरोधकांच्या मोहिमेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. दोन दिवसांच्या दौऱ्यात प्रियांका लखीमपूर येथून प्रचार सुरु करतील. त्या ब्रह्मपुत्रा नदीच्या उत्तर किनाऱ्यातील अनेक जिल्ह्यांतून जातील, जेथे भाजप आणि आसाम गण परिषद (एजीपी) यांचे वर्चस्व राहिले आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आसामच्या वरच्या भागात सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात (सीएए) सुमारे दोन महिने तीव्र निदर्शने झाली. त्यामुळे निवडणूकीच्यादृष्टिने हा भाग महत्त्वाचा ठरला आहे. भाजपने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अनेक विकास प्रकल्पांची घोषणा केली आहे, पण जनतेत विधेयकाविरुद्ध असलेल्या असंतोषाचा फायदा उठविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न राहील. 
राहुल गांधी यांनी फेब्रुवारीच्या प्रारंभी आसाम दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी सीएएविरोधी गमोसा मोहीम सुरु केली होती. त्यात गमोसा या आसामच्या पारंपरिक वस्त्रावर स्वाक्षरी करण्याचे आवाहन नागरीकांना करण्यात आले. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोहिमेला सर्वाधिक पाठिंबा या भागातून मिळाला.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

चहा मळ्यांतील महिला मजुरांची भेट
प्रियांका गांधी बिश्वनाथ येथील साधारी या चहाच्या मळ्याला भेट देतील आणि महिला मजूरांशी चर्चा करतील. गोहपूर येथील महिला कामगारांची भेट घेऊन त्या त्यांचे प्रश्न जाणू घेतील.