esakal | दुर्दैवी! चिमुकल्याला वाचवायला गेलेल्या दहा जणांवर काळाचा घाला!
sakal

बोलून बातमी शोधा

दुर्दैवी! चिमुकल्याला वाचवायला गेलेल्या दहा जणांवर काळाचा घाला!

दुर्दैवी! चिमुकल्याला वाचवायला गेलेल्या दहा जणांवर काळाचा घाला!

sakal_logo
By
नामदेव कुंभार

Vidisha Accident Update : विहिरीत पडलेल्या अल्पवयीन मुलाला वाचविताना अनेकजण विहिरीत पडले. त्यातील 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भोपाळजवळ असलेल्या विदिशा जिल्हा मुख्यालयापासून ५० कि.मी.वरील लाल पातर गावात गुरुवारी (ता. १५) मध्यरात्री ही घटना घडली. गुरुवारी रात्री दोघांचा तर शुक्रवारी रात्री आणखी काही जणांचे मृतदेह सापडले. शनिवारी सकाळी मिळालेल्या वृत्तानुसार, आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दहा वर्षाच्या चिमुकल्याचाही समावेश आहे. विहिरीची भिंत कोसळल्यामुळे अनेकजण विहिरीत पडले. भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले. त्यांना काढण्यासाठी बचावकार्य राबविले जात आहे. 20 जणांना विहिरीतून काढून उपचारासाठी रुग्णालयात हलविले. जवळपास 24 तासांपेक्षा जास्त काढ बचावकार्य सुरु होतं.

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेप्रति दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच या दुर्घेटनेत मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन-दोन लाखांची मदत जाहीर केली आहे.

हेही वाचा: नीरेत मुळशी पॅटर्न, कुख्यात गुंड गणेश रासकरची भर चौकात हत्या

गुरुवार सायंकाळी साडेसहा वाजता बचावकार्यला सुरुवात झाली होती. दहा वर्षांच्या मुलाचा मृतदेह शुक्रवारी संध्याकाळी सर्वात शेवटी निघाला आहे. या दहा वर्षांच्या मुलाला वाचवण्यासाठी सर्वजण विहिरीजवळ आले. त्याचवेली भिंत कोसळल्यामुळे सर्वजण आतमध्ये पडले होते. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 जण जखमी झाले आहेत. जखमीची प्रकृती सध्या स्तिर असल्याचं सांगितलं जात आहे.

हेही वाचा: कोरोनानंतर Monkeypox चा धोका; अशी आहेत लक्षणे

loading image