Vijay Divas 2022 : पाणीपुरी विकता विकता अभ्यास केला; सामान्य मुलगा हवाई दलात पायलट झाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vijay Divas 2022

Vijay Divas 2022 : पाणीपुरी विकता विकता अभ्यास केला; सामान्य मुलगा हवाई दलात पायलट झाला

Success Story : जर तुमचे ध्येय पक्क असेल तर बऱ्याच गोष्टी शक्य होतात. याचंच उदाहरण मध्यप्रदेशात बघायला मिळालं. वडिलांसोबत पाणीपुरी विकण्याचं काम करणाऱ्या तरुणाची एयरफोर्समध्ये पायलट म्हणून नियुक्ती झाली आहे.

मध्यप्रदेशातल्या नीमच जिल्ह्यातल्या मनासा गावात पाणीपुरी विकतो. रविकांतला लहानपणापासून पायलट बनायचं होतं. जसं त्याला समजायला लागलं त्याने आपलं स्वप्न साकार करण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू केले. यासाठी दिवसरात्र कष्ट घेतले.

रविकांतची भारतीय हवाईदलात पायलट म्हणून निवड झाली आहे. त्याचं वय २१ वर्ष आहे. त्याने पहिल्याच प्रयत्नात एयरफोर्स कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट क्लियर केली. त्याच्यासाठी आव्हानं आणि अडचणी भरपूर होत्या. कोरोना काळात त्यांचा ठेला बंद झाला होता. साधारण दीड वर्ष कर्ज काढून वडिलांनी कसंबसं घर चालवलं.

पण रविकांतची वायूसेनेतील भरती हे सगळ्यांसाठीच कल्पने पलिकडचं होतं. पण त्याची मेहनत यशस्वी झाली. लवकरच तो हैद्राबादला पायलट प्रशिक्षणासाठी जाणार आहे.

टॅग्स :vijay diwas kargil