esakal | विजय मल्ल्याला ब्रिटन न्यायालयाचा दणका; कर्जवसूलीचे मार्ग मोकळे
sakal

बोलून बातमी शोधा

विजय मल्ल्याला ब्रिटन न्यायालयाचा दणका; कर्जवसूलीचे मार्ग मोकळे

विजय मल्ल्याला ब्रिटन न्यायालयाचा दणका; कर्जवसूलीचे मार्ग मोकळे

sakal_logo
By
विनायक होगाडे

लंडन : कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून देशाबाहेर पळ काढणाऱ्या विजय मल्ल्याला आज ब्रिटनमधील न्यायालयाने मोठा धक्का दिला. यासंदर्भातील खटला तो हारला आहे. येथील कंपनी न्यायालयातील न्यायाधीशांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील बँकांच्या समूहाच्या बाजूने निकाल दिला. या निकालामुळे मल्ल्याकडील थकीत कर्ज वसूल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बँकांना 9 हजार कोटी रुपयांचा चुना लावून भारतातून फरार होणाऱ्या विजय मल्ल्याला (Vijay Mallya) हा मोठा झटका आहे. यामुळे मल्ल्याच्या किंगफिशर एअरलाईन्स (Kingfisher Airlines) जी आता बंद झाली आहे, त्या कंपनीला दिलेलं कर्ज आता बँकेला वसूल करणं सोपं होणार आहे.

हेही वाचा: दिलासादायक! रूग्णघट सुरूच; राज्यात 28,438 नवीन रुग्ण

SBI च्या नेतृत्वाखाली बँकांनी आपल्या याचिकेमध्ये लंडन हायकोर्टामध्ये अपील केली होती की, त्यांनी माल्याच्या भारतातील संपत्तीवर लावलेले सिक्योरिटी कव्हर हटवावं ज्याला लंडनच्या कोर्टाने स्विकारलं आहे. या निर्णयामुळे भारतातील बँकांना माल्याची संपत्तीचा लिलाव करुन कर्जवसूली करणं शक्य होईल. लंडनच्या हायकोर्टाचे चीफ इन्सॉल्वेंसी एँड कंपनीज कोर्टाचे (ICC) जज मायकल ब्रिग्स (Michael Briggs) यांनी भारतीय बँकांच्या बाजूने निर्णय देत म्हटलंय की अशी कोणतीही पब्लिक पॉलिसी नाहीये जी माल्याच्या संपत्तीला सिक्योरिटी राईट्स प्रदान करेल.

हेही वाचा: इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षात भारत कोणाच्या बाजुने?

प्रत्यार्पणाला होऊ शकतो उशीर

ब्रिटनमध्ये प्रत्यार्पणाची केस हारल्यानंतर बँकांना 9 हजार कोटी रुपयांचा चुना लावून भारतातून पळणाऱ्या विजय माल्याच्या प्रत्यार्पणामध्ये उशीर होऊ शकतो. मल्ल्या शक्य ते सर्वोतपरी प्रयत्न करुन भारतात येणं टाळणारच आहे. माल्याच्या विरोधात क्रिमीनल कॉन्सपिरेसी आणि फ्रॉडचा देखील आरोप आहे. कायद्याचे अभ्यासक सांगतात की ब्रिटनमध्ये मल्ल्या जिंकण्याची शक्यता नाहीये, मात्र तरिही माल्याच्या कायदेशीर डावपेचामुळे त्याला ब्रिटनमध्ये आणखी काही दिवस राहण्यासाठी वेळ मिळाला आहे. मात्र, ब्रिटनमध्येच राहण्याचे त्याचे सगळे कायदेशीर मार्ग बंद झाल्यात जमा आहे.