esakal | दिलासादायक! रूग्णघट सुरूच; राज्यात 28,438 नवीन रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

दिलासादायक! रूग्णघट सुरूच; राज्यात 28,438 नवीन रुग्ण

दिलासादायक! रूग्णघट सुरूच; राज्यात 28,438 नवीन रुग्ण

sakal_logo
By
विनायक होगाडे

मुंबई : आज मंगळवारी राज्यात (Maharashtra) 28,438 नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना (Corona Update) बाधित रुग्णांची एकूण संख्या 54,33,506 झाली आहे. आज 54,898 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण 49,27,480 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.69% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण 4,19,727 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. (Corona Update Maharashtra 28438 new patients in the state today)

राज्यात आज 679 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. आज नोंद झालेल्या एकूण 679 मृत्यूंपैकी 422 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 257 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या 612 ने वाढली आहे.

हेही वाचा: मुरुडच्या किनाऱ्यावर डॉल्फिन, युवकाची मन जिंकून घेणारी कृती

हेही वाचा: उजनीच्या पाण्यासंदर्भातील आदेश रद्द ! जलसंपदामंत्री जयंत पाटलांची घोषणा

सध्या राज्यातील मृत्यूदर 1.54% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,15 88,717 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 54,33,506 (17.2 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.सध्या राज्यात 30,97,161 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 25,004 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Union Health Ministry) दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी देशात दोन लाख 63 हजार 533 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. याच कालावधीत तब्बल चार लाख 22 हजार 436 जणांनी कोरोनावर मात केली. तर चार हजार 329 जणांचा मृत्यू झाला आहे. महिनाभरापासानू देशात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं तांडव सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज चार हजारांच्या आसपास कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे.