esakal | ... म्हणून BJP नं विजय रुपाणींना बळीचा बकरा बनवलं: काँग्रेस
sakal

बोलून बातमी शोधा

Vijay Rupani

... म्हणून BJP नं विजय रुपाणींना बळीचा बकरा बनवलं: काँग्रेस

sakal_logo
By
सुधीर काकडे

गुजरातचे (Gujrat) मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राजीनामा दिला (Vijay Rupani Resign) आणि राजकीय वर्तुळात वेगवेळ्या चर्चांना उधान आलं. विजय रुपाणी यांनी हा राजीनामा देताना आपण स्वखुशीने राजीनामा देत असल्याचे सांगितले. मात्र गुजरात काँग्रेसचे (Congress) विजय रुपाणी यांना भारतीय जनता पक्षाचे (BJP) अपयश लपवण्यासाठी बळीचा बकरा बनवण्यात आला असल्याची टीका केली आहे.

गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमित छावडा यांनी सांगितले की, गुजरातमध्ये असलेलं भारतीय जनता पक्षाचे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलं. आम्हाला माहिती आहे की, हे सरकार दिल्लीतून रिमोट कंट्रोलने चालवले जाते. ते पुढे बोलताना असंही म्हणाले की, आनंदीबेन पटेल यांना देखील अशाच प्रकारे त्यांचा कार्यकाळ संपण्यापुर्वी राजीनामा द्यायला सांगितले होते. त्यानंतर आता विजय रुपाणी यांच्या बाबतीत देखील असेच झाले. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय जनता पक्षाने त्यांचं अपयश लपवण्यासाठी विजय रुपाणी यांचा बळी दिल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

हेही वाचा: महापौर ते मुख्यमंत्री! विजय रुपाणींची राजकिय कारकीर्द एका क्लिकवर

दरम्यान, सीआर पाटील यांना भारतीय जनता पक्षाच्या गुजरात प्रदेश अध्यक्ष पदाचा पदभार दिल्यापासुन गुजरात भाजपमध्ये अंतर्गत कलह असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता विजय रुपाणी यांच्या राजीनाम्याने आणखी शिगेला पोहोचले आहेत. तसेच राज्यात कोरोना काळात तीन लाख लोकांचा मृत्यू झाला असून, सरकार महामारीचे नियोजन करण्यात देखील अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

loading image
go to top