Vijay Thalapathy rally तामिळ सुपरस्टार विजयच्या रॅलीत प्रचंड चेंगराचेंगरी; ३५ मृत्यू, ७० जण जखमी

Tamil Superstar Vijay rally stampede करुर येथे शनिवारी विजय थलापतीच्या प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं.
Crowd chaos at Vijay Thalapathy’s Karur rally led to a tragic stampede, leaving 35 dead and over 70 injured.

Crowd chaos at Vijay Thalapathy’s Karur rally led to a tragic stampede, leaving 35 dead and over 70 injured.

esakal

Updated on

Vijay Thalapathy Rally in Karur: अभिनेता विजयच्या रॅलीत प्रचंड चेंगराचेंगरी घडली आहे. ज्यामध्ये प्राप्त माहितीनुसार ३५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ७० पेक्षा अधिकजण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेवर  पंतप्रधान मोदींनीही शोक व्यक्त केला आहे. तर मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले असून, पीडितांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

करुर येथे शनिवारी विजय थलापतीच्या प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. विजय थलापतीला बघण्यासाठी लोकांनी तुफान गर्दी केली होती. भाषण ऐकायला मिळावं, यासाठी लोकांनी झुंबड उडाली होती. हा भाग द्रमुकचा बालेकिल्ला समजला जातो. सभेसाठी गर्दी वाढल्याने चेंगराचेंगरी झाली आणि गोंधळ उडाला.

अनेकांना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. त्यामुळे आणखीच गोंधळ झाला. अनेकजण बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र या घटनेत आतापर्यंत ३५ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Crowd chaos at Vijay Thalapathy’s Karur rally led to a tragic stampede, leaving 35 dead and over 70 injured.
Sadabhau Khot VIDEO : सदाभाऊंना करावा लागला शेतकरी अन् ग्रामस्थांच्या रोषाचा सामना; पाहणी न करताच घेतला काढता पाय!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर या घटनेबद्दल पोस्ट करत शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, "तामिळनाडूतील करूर येथे राजकीय रॅलीदरम्यान घडलेली दुर्दैवी घटना अत्यंत दुःखद आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत. या कठीण काळात मी त्यांना शक्ती मिळो अशी प्रार्थना करतो. सर्व जखमींच्या लवकर बरे वाटावे यासाठी मी प्रार्थना करतो."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com