Farmers and villagers in Madha expressing anger during Sadabhau Khot’s visit.
Farmers and villagers in Madha expressing anger during Sadabhau Khot’s visit : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार सदाभाऊ खोत हे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागांची पाहणी करण्यासाठी सोलापूरमधील माढा येथे गेले असता तिथे त्यांना ग्रामस्थांच्या रोषाचा सामना करावा लागला. आम्ही तुम्हाला खासदारकीच्या निवडणुकीवेळी मताधिक्य मिळवून दिलं, परंतु तरीही तुम्ही आजपर्यंत आमच्या गावात आला नव्हता, असं का? हा जाब गावकऱ्यांना भरपावसात सदभाऊंना घेराव घालून विचारला.
तसंच आम्ही २५ हजारांचा निधी देवून तुमच्या गळ्यात पाच-पाच हजारांच्या माळा घातल्या. या गावाने तुमच्यावर प्रेम केलं, तुम्हाला मताधिक्य मिळवून दिलं, त्यानंतरही तुम्ही आजपर्यंत आमच्या गावाला आला नाहीत, हे आमचं म्हणणं आहे. आम्हाला याचं उत्तर द्या.
पूराची पाहणी करण्यासाठी उशीर केल्याची भावना. यावेळी ग्रामस्थांमध्ये होती. तर काही ग्रामस्थांकडून असा आरोप केला जात आहे की, विविध शासकीय अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवी सुरू आहे. जनावरांना चारा मिळणे कठीण झाले आहे.
दरम्यान सदाभाऊ ग्रामस्थांचे म्हणणे ऐकत असताना, अन्य काही ग्रामस्थांनी घोषणाबाजी, गोंधळ सुरू केल्याचे दिसले. अखेर सदाभाऊ पाहणी न करता आल्या पावली माघारी फिरले. ते गाडीतून माघारी जात असतानाही काही ग्रामस्थ त्यांच्यावर रोष व्यक्त करताना दिसले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.