Vijay Thalapathy: मुख्यमंत्रिपदाचे विजय उमेदवार; ‘टीव्हीके’च्या सभेत निर्णय, विधानसभेत दोनच पक्षांत लढत होईल
Tamil Nadu Elections: तमिळनाडूमध्ये आगामी विधानसभा निवडणूक केवळ टीव्हीके आणि द्रमुकमध्ये ठरलेली आहे. टीव्हीकेचा आघाडीवर विजय होईल, असे पक्षाचे सर्वेसर्वा विजय म्हणाले.
महाबलीपुरम (तामिळनाडू) : तमिळनाडूची आगामी विधानसभा केवळ दोनच पक्ष टीव्हीके आणि द्रमुक यांच्यातच असेेल आणि टीव्हीके हा द्रमुकला भक्कम पर्याय म्हणून सिद्ध होईल, असा दावा अभिनेते आणि टीव्हीके पक्षाचे सर्वेसर्वा विजय यांनी केला.