Bhimangouda Biradar Killing
esakal
बंगळूर : भीमा नदीच्या पट्ट्यात पुन्हा एकदा रक्तपात झाल्याचे वृत्त आहे. बुधवारी हल्लेखोरांनी विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील देवर निंबर्गी गावातील ग्रामपंचायत (Nimbargi Gram Panchayat) अध्यक्ष भिमानगौडा बिरादार (वय ४३) यांची भरदिवसा हत्या (Bhimangouda Biradar Killing) केली. दरम्यान, पोलिसांनी राजिउल्लाह मकंदर, वसीम मुनियार, फिरोज शेख आणि मौलाली लाडलेसाब या चार जणांना अटक केली आहे, असे जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष्मण निंबार्गी यांनी माध्यमांना सांगितले. हे सर्वजण देवर निंबार्गी गावातील आहेत.