esakal | विकास दुबेनं तुरुंगात असताना जिंकली होती निवडणूक, आता पोलिसांवर केला मोठा हल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

 vikas dubey, UP, Kanpur

यापूर्वी पोलिस ठाण्यात घुसून संतोष शुक्ला यांची हत्या केल्याचा आरोप असतानाही पुरावा नसल्याच्या कारणामुळे विकास दुबे निर्दोष सुटलाय

विकास दुबेनं तुरुंगात असताना जिंकली होती निवडणूक, आता पोलिसांवर केला मोठा हल्ला

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

कानपूर : गुरुवारी मध्यरात्री कुख्यांत गुंड विकास दुबेला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर बेछुड गोळीबार झाला.  देशातील पोलिस पथकावर गुंडाकडून करण्यात आलेला हा एक मोठा हल्ला असून ही घटना देशाला हादरवून सोडणारी आहे. विकास दुबे आणि त्याच्यासोबतच्या टोळक्याने केलेल्या गोळीबारात अधिकाऱ्यासह 8 पोलिस शहीद झाले आहेत तर अनेक पोलिस जखमी झाले आहेत. गुरुवारी रात्री जवळपास साडेबाराच्या सुमारास बिठूर आणि चौबेपुर पोलिसांनी संयुक्तरित्या मोहिम आखून विकास दुबेच्या बिकरू या गावातील घराला घेराव घातला होता. पोलिसांच्या कारवाईची माहिती लागल्यामुळे सावध झालेल्या टोळक्याने पोलिसांवर गोळीबार केला.

रशियाकडून मिळणार सुखोई अन्‌ मिग विमाने;संरक्षण साहित्य खरेदी समितीकडून मान्यता

बिठूर पोलिस ठाण्याचे अधिकारी कौशलेंद्र प्रताप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी 8 ते 10 जणांनी पोलिसांवर बेछूड गोळीबार केला. घरातून आणि घराच्या छतावरुन गोळीबार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. एसओ कौशलेंद्र यांनाही दोन गोल्या लागल्या. त्यांच्याशिवाय  अजय सेंगर, अजय कश्यप, शिवमूरत, पोलिस निरिक्षक प्रभाकर पांडेय, होमगार्ड जयराम पटेल यांच्यासह सात पोलिस कर्मचारी जखमी झाले.  सेंगर आणि शिवमूरत यांच्या पोटात गोळी लागली. हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या कारवाईची त्यांना खबर लागली होती. त्यामुळे त्यांनी संपूर्ण तयारीसह पोलिसांवर हल्ला केला. विकास दुबे हा कुख्यात गुंड असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 2003 मध्ये शिवली ठाण्यामध्ये घुसून त्याने तत्कालीन राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेल्या भाजपचे नेते संतोष शुक्ला यांची हत्या त्याने केली होती. याशिवाय त्याच्यावर राज्यात अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. संतोष शुक्ला हत्याकांड प्रकरण उत्तर प्रदेशमध्ये चांगलेच गाजले होते. 


पोलिसांनी त्याच्याविरोधात साक्षच दिली नव्हती....

पोलिस ठाण्यात घुसून संतोष शुक्ला यांची हत्या केल्याचा आरोप असतानाही पुरावा नसल्याच्या कारणामुळे विकास दुबेला न्यायालयाने निर्दोष सोडले होते. पोलिसांनीही विकास विरोधात साक्ष दिली नव्हती.  

चुलतभावासह अन्य काही प्रकरणात आरोप 

2000 मध्ये कानपूरच्या शिवली पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ताराचंद इंटर कॉलेजचे सहाय्यक व्यवस्थापक सिद्धेश्वर पांडेय यांच्या हत्येप्रकरणातही त्याच्यावर आरोप झाले होते. याचवर्षी रामबाबू यादव यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोपही त्याच्यावर झाला होता. 2004 मध्ये केबल व्यावसायिक दिनेश दुबे याची हत्या झाली होती. यातही विकास दुबेचा हात असल्याचे बोलले जाते. 2013 मध्ये त्याच्यावर गंभीर आरोप झाले.  

देशातील स्मारके होणार 6 जुलैपासून खुली; लाल किल्ल्यासह 3400 स्मारकांचा समावेश

तुरुंगात असताना भावाची हत्या
 

2018 मध्ये विकास दुबेने आपल्या चुलत भाऊ शलेल्या अनुरागवर जीवघेणा हल्ला केला होता.अनुरागची पत्नीने विकाससह चार जणांविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.  विकास दुबेची अनेक राजकीय पक्षांवरही चांगलीच पकड होती. 2002 मध्ये मायावती सरकारच्या काळात त्याची राज्यात चांगलीच दहशत होती. अवैध जमीन खरेदीचे व्यवहार, खंडणी यातून त्याने कोट्यवधीची संपत्ती कमावली. याच्या जोरावर त्याने बिठूरमध्ये स्कल आणि कॉलेज काढली. एका लॉ कॉलेजचाही तो मालक आहे.  
 

तुरुंगात असताना जिंकली होती निवडणूक 

विकास दुबेने तुरुंगात असताना शिवराजपूर नगर पालिकेची निवडणूक जिंकली होती. मायावती सरकारच्या काळात त्याने अमाप गुन्हे केल्याचे बोलले जाते.  

loading image
go to top