esakal | विकास दुबे एनकाऊंटरमध्ये गेला पण.... हे १० प्रश्न मात्र अनुत्तरितच !
sakal

बोलून बातमी शोधा

vikas dubey encounter leaders or police cops who were behind them these 10 questions

विकास दुबेच्या जाण्यासोबत काही प्रश्न मात्र अनुत्तरीत राहिले आहेत. 

विकास दुबे एनकाऊंटरमध्ये गेला पण.... हे १० प्रश्न मात्र अनुत्तरितच !

sakal_logo
By
वृत्तसंस्था

कानपूर : उत्तर प्रदेश पोलिस पथकातील अधिकाऱ्यासह ८ पोलिस कर्मचाऱ्यांच्या हत्याकांडातील प्रमुख सूत्रधार विकास दुबे याचा फिल्मी स्टाइल खात्मा झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश स्पेशल स्टास्क फोर्स (एसटीएफ) च्या वाहनातून विकास दुबेला मध्य प्रदेशमधून कानपुरच्या दिशेने नेत असताना वेगाने असणारी गाडी (ज्यात विकास दुबेला बसवण्यात आले होते) अचानक पलटी झाली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

या अपघातामध्ये विकास दुबेसह वाहनातील काही जवानही जखमी झाले. या अपघातातून सावरत असतानाच मोक्याचा फायदा उठवत विकास दुबेने एसटीएफच्या एका अधिकाऱ्याची पिस्तूल हिसकावून घेतली. त्यानंतर जवान आणि विकास दुबे यांच्यात चकमक झाली. एसटीएफने विकासला पिस्तूल खाली ठेवत सरेंड होण्याची सूचना दिली. मात्र विकास दुबेने याला प्रतिसाद न दिल्याने पोलिसांना त्याचा एन्काउंटर करावा लागला असल्याचे सांगण्यात असले तरी विकास दुबेच्या जाण्यासोबत काही प्रश्न मात्र अनुत्तरीत राहिले आहेत. 

विकास दुबेच्या एनकाउंटरवर प्रियंका गांधींची प्रतिक्रिया; म्हणाल्या....

विकास दुबेबाबत १० अनुत्तरित प्रश्न
१) कानपुरमध्ये ८ पोलिसांना मारल्यानंतर विकास दुबे उज्जैनला कसा पोहोचला?
२) विकास दुबेला उज्जैनला पोहोचण्यासाठी कोणी-कोणी मदत केली?
३) विकास दुबेने कोणाच्या मदतीने नकली आधार कार्ड बनविले? यात त्याची कोणी मदत केली?
४) विकास दुबेच्या डोक्यावर कोणत्या राजकिय नेत्यांचा वरदहस्त आहे? ज्यामुळे विकास दुबेची पोलिसांमध्ये दहशत होती.
५) २०२२ मध्ये तो विधानसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत होता. असे असेल तर तो कोणत्या पक्षाकडून तिकीट मिळवण्याच्या प्रयत्नात होता?
६) २००१मध्ये राज्यमंत्री सुरेश शुक्ला यांच्या हत्येच्या आरोपातून तो निर्दोष सुटल्यावर कोणाच्या दबावामुळे न्यायालयात पुन्हा अपील करण्यात आली नाही?
७) विकास दुबेचा एनकाऊंटर कोणाच्या दबावाखाली झाला आहे का?
८) ७ राज्यांच्या अलर्टमध्ये असतानाही आतापर्यंत विकास दुबे कोणत्याही पोलिसांच्या हाती का सापडला नाही?
९) सीओ देवेंद्र मिश्रांची सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित चिठ्ठीमागचे सत्य काय?
१०) विकास दुबेवर ६० केसेस चालू असतानाही प्रदेशातील किंवा जिल्ह्यातील महत्वाच्या १० गुन्हेगारांमध्ये समावेश का नव्हता? याला जबाबदार कोण?