
नवी दिल्ली : 'विकसित भारत विकसित गोवा २०४७' या कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गोव्यातील विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी मोदींनी गोव्याचं व्हिजन मांडलं तसेच इथल्या ख्रिश्चन समुदयाबरोबरच इतर समुदयाचा उल्लेख करत हे 'एक भारत, श्रेष्ठ भारत'चं उदाहरण असल्याचं म्हटलं आहे. (Viksit Bharat Viksit Goa 2047 PM Modi vision developed Goa referring to Christian community)
मोदी म्हणाले, ऐतिहासिक लोहिया मैदान हा पुरावा आहे की, जेव्हा देशासाठी काहीतरी करायची वेळ येते तेव्हा गोव्याच्या लोकांनी कसलीही कसर सोडलेली नाही. तसेच गोव्यामधील ख्रिश्चन समुदाय आणि इतर धर्मीय लोक सौहार्द्यानं इथं राहत आहेत, हे 'एक भारत, श्रेष्ठ भारत'चं एक खूपच चांगलं उदाहरण आहे. (Marathi Tajya Batmya)
लोकसंख्येच्यादृष्टीनं विचार केल्यास गोवा छोटा आहे, पण जेव्हा सामाजिक विविधतेचा मुद्दा येतो तेव्हा गोवा हा सर्वात मोठा होतो. या ठिकाणी विविध समुदाय, विविध धर्माचे नागरिक एकत्र राहतात. अनेक पिढ्यांपासून ते एकत्र राहत आहेत. त्यामुळं जेव्हा हे लोक भाजपला वारंवार निवडून देतात, यातून देशभरात एक संदेश गेला आहे. 'सबका साथ, सबका विकास' हाच भाजपचा मंत्र हाच आहे. पण भारतातील काही राजकीय पक्ष आहेत जे कायमच लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार करण्याचं राजकारण करत असतात. पण गोव्यानं कायम अशा पक्षांनं जशास तसं उत्तर दिलं आहे, असं मोदी यावेळी म्हणाले. (Latest Marathi News)
केंद्र सरकारच्या अनेक योजना गोव्यानं शंभर टक्के राबवल्या आहेत. आपल्या सर्वांना माहित आहे की जेव्हा या योजना सर्वांपर्यंत पोहोचतात तेव्हा मतभेद संपतात, लाभ प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचतात, लोकांना त्यांचे हक्क मिळविण्यासाठी लाच देण्याची गरज नसते. म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतो की हे सॅच्युरेशनच खरी धर्मनिरपेक्षता, खरा सामाजिक न्याय आहे. हीच मोदींची गोवा आणि देशासाठीची हमी आहे," असंही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.