पक्ष्याच्या पिलांसाठी हे गाव चक्क ३५ दिवस अंधारात

वॉल्टर स्कॉट
Monday, 27 July 2020

इंडियन रॉबिन (चिरक) हा पक्षी आणि त्याच्या नुकत्याच जन्‍मलेल्या पिलांसाठी संपूर्ण गाव तब्बल ३५ दिवस अंधारात राहिले. गावातील विजेच्या खांबावर रस्त्यावरील दिवे लावण्याचा स्विच बोर्ड आहे. या बोर्डातच सुरक्षित जागा शोधून रॉबिनने घर बांधण्यास सुरुवात केली तेव्हा गावातील युवकांनी त्याला हटकले नाही. यानंतर दोन दिवसातच पक्ष्याने घरट्यात तीन अंडी घातली. हे पाहून युवकांनी व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला आणि रॉबिनच्या हालचालींवर लक्ष ठेवले.

चेन्नई - तमिळनाडूतील संगमा काळातील तमिळ राजे पारी आणि पेगन यांच्या प्राणिमात्रांवरील प्रेमाच्या आणि दयाळूपणाच्या गोष्टींना उजाळा देणारी घटना शिवगंगा जिल्ह्यातील एका गावात घडली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इंडियन रॉबिन (चिरक) हा पक्षी आणि त्याच्या नुकत्याच जन्‍मलेल्या पिलांसाठी संपूर्ण गाव तब्बल ३५ दिवस अंधारात राहिले. गावातील विजेच्या खांबावर रस्त्यावरील दिवे लावण्याचा स्विच बोर्ड आहे. या बोर्डातच सुरक्षित जागा शोधून रॉबिनने घर बांधण्यास सुरुवात केली तेव्हा गावातील युवकांनी त्याला हटकले नाही. यानंतर दोन दिवसातच पक्ष्याने घरट्यात तीन अंडी घातली. हे पाहून युवकांनी व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला आणि रॉबिनच्या हालचालींवर लक्ष ठेवले. अंडी उबण्यासाठी त्याला योग्य वातावरण व शांतता मिळावी, यासाठी बोर्डावरील बटण दाबू नये व रस्त्यावरील दिवे बंद ठेवण्याची विनंती युवकांनी ग्रामस्थ व सरपंचांना केली. यानंतर पिले जन्माला येऊन आकाशात भरारी घेईपर्यंत ३५ दिवस संपूर्ण गावातील रस्त्यांवर अंधार होता.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The village is in darkness 35 days for Chicks of birds

Tags
टॉपिकस
Topic Tags: