'ती' एक दुर्दैवी घटना आणि गाव झाले कायमचे तंबाखूमुक्त!

tamilnadu
tamilnaduesakal

तामिळनाडू : विल्लुपुरम जिल्ह्यातील एक गाव असे आहे. या गावात एक अशी घटना घडली. ज्यामुळे इथल्या नागरिकांनी जवळपास चार दशकांपासून सिगारेटसह तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री आणि वापरावर कायमची बंदी घातली. आणि हेच गाव आता इतर गावांसाठी तंबाखूमुक्त होण्यासाठी आदर्श समोर ठेवत आहे. कोणते आहे ते गाव...वाचा सविस्तर...

त्या घटनेनंतर हे गाव तंबाखूमुक्तीसाठी ठेवतेय आदर्श

विल्लुपुरम शहरापासून 20 किमी अंतरावर असलेल्या 'एलुसेम्पॉन' गावातील नागरिकांनी तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घातली आहे. या गावात आधी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केले जात असे. पण त्या घटनेनंतर काही गावकरी ज्येष्ठ नागरिकांनी दिलेला वसा पुढे चालवत आहेत, या गावामध्ये 2,700 नागरिक आणि 570 पेक्षा जास्त कुटुंबे आहेत, जी विल्लुपुरम जिल्ह्यातील विकरवंडी विधानसभा क्षेत्रात येतात. इथल्या गावकऱ्यांनी गावात येणाऱ्या लोकांना तसेच गावाच्या हद्दीत धूम्रपान किंवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन न करण्याची विनंती केली आहे. गावाने तंबाखूजन्य पदार्थ न खाण्यामागे एक इतिहास आहे, ज्यामुळे इथल्या लोकांच्या मनात कायमची भिती निर्माण झाली आहे.

या गावातील एका नागरिकाने धूम्रपान करताना जळती बिडी नकळत फेकून दिली आणि त्यांचे रुपांतरण एका मोठ्या आग दुर्घटनेत झाले, साधारण चार दशकांपूर्वी गरीब गावकऱ्यांच्या मालमत्तेचा या आगीत नाश झाला. या घटनेमुळे गावातील ज्येष्ठांनी गावात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री आणि सेवनवर बंदी लागू करण्यास भाग पाडले. तेव्हापासून, पुढील तीनही पिढ्या या आदेशाचा आदर करतात आणि गावाची तंबाखूमुक्त ओळख कायम ठेवतात. या गावात जर पाहिले तर सर्व ठिकाणी धूम्रपानावर बंदी घोषित करणारे पोस्टर लावण्यात आले आहेत.

tamilnadu
भारतात लहान मुलांसाठी येणार आणखी एक लस

ग्रामस्थांनी सांगितले की, इथल्या पिढीने कित्येक वर्षांपासून तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घातली आहे. पण असे काही लोक होते जे सार्वजनिक शिस्तीचे पालन करत नव्हते. ते धूम्रपान करण्यासाठी किंवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यासाठी गावाबाहेर गेले. बहुतेक जण तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनावर आक्षेप घेतल्यावर चकित होतात पण नंतर आमच्या निर्णयाचे कौतुक करतात, इथले काही ग्रामस्थ सांगतात, एकदा ग्रामस्थ आणि तंबाखूमुक्तीचा विरोध करणाऱ्यांमध्ये हाणामारी होते. 'एलुसेम्पॉन' ने 40 वर्षांपासून तंबाखूमुक्त गावाची प्रतिमा जरी सांभाळली असली, तरी त्याला केंद्र किंवा राज्य सरकार किंवा कोणत्याही अशासकीय संस्थांनी मान्यता दिलेली नाही. गावकऱ्यांनी याबाबत एक आठवणही सांगतात, की दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी गावाबद्दल जाणून घेतल्यावर त्यांना भेट देण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच त्यांनी तंबाखूजन्य पदार्थ आणि त्यांच्या वापरावर बंदी आहे की नाही हे तपासण्यासाठी त्यांचे प्रतिनिधीही गावात पाठवले होते."

tamilnadu
Corona Update : देशात पाच महिन्यानंतर सर्वात कमी सक्रीय रुग्ण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com