

Special court sentences Congress MLA Vinay Kulkarni and 16 others to life imprisonment in the 2016 BJP leader murder case following a detailed CBI investigation.
esakal
कर्नाटकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपच्या एका नेत्याच्या हत्येप्रकरणी काँग्रेसचे आमदार विनय कुलकर्णी यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या काँग्रेस आमदाराव्यतिरिक्त या हत्येत सहभागी असलेल्या इतर १६ व्यक्तींनाही जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. बुधवारी, लोकप्रतिनिधींशी संबंधित खटल्यांची सुनावणी करण्यासाठी नेमलेल्या एका विशेष न्यायालयाने, १० वर्षे जुन्या असलेल्या या खटल्याचा निकाल दिला.