Himachal Election Results : हिमाचलातील निकालामुळं भाजपात खळबळ; महाराष्ट्रातील 'या' बड्या नेत्याला पाठवलं शिमल्यात!

सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मागं टाकत काँग्रेस आघाडीवर आहे.
Himachal Pradesh Assembly Election Results 2022
Himachal Pradesh Assembly Election Results 2022esakal
Summary

सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मागं टाकत काँग्रेस आघाडीवर आहे.

Himachal Pradesh Election News : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल जसजसे समोर येत आहेत, तसतसं सत्तेचं गणित बिघडताना दिसत आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मागं टाकत काँग्रेस आघाडीवर आहे. ताज्या माहितीनुसार काँग्रेस 35, भाजप 31 आणि अपक्ष 2 जागांवर आघाडीवर आहे.

या ट्रेंडचा परिणाम भाजपवर स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळं पक्षात गोंधळ सुरू झाला आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी पक्षानं राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना शिमल्यात पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विनोद तावडे हे भाजपचे तगडे नेते मानले जातात.

Himachal Pradesh Assembly Election Results 2022
Himachal Election : निकाल राहिला लांब कॉंग्रेसच्या 'या' नेत्या म्हणतात मीच होणार मुख्यमंत्री

विनोद तावडे हे मूळचे महाराष्ट्राचे असून पक्षाच्या हायकमांडनं त्यांना बिहारचं प्रभारी बनवलं आहे. तावडे हे लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. ते एक कुशल संघटक आणि कुशल प्रशासक मानले जातात. विनोद तावडे यांनी 2014 ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक बोरिवलीतून लढवली आणि जिंकली. पहिल्या विजयातच ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातही सामील झाले.

Himachal Pradesh Assembly Election Results 2022
Himachal Election Results : हिमाचल 'त्रिशंकू' झालं तर काय, कोणाचं सरकार स्थापन होणार?

हिमाचल प्रदेशात विधानसभेच्या 68 जागांसाठी 12 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान झालं. इथं मुख्य लढत काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपमध्ये आहे. आम आदमी पक्षानंही याठिकाणी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश आलं नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com