प. बंगाल : TMC नेत्याच्या हत्येनंतर 12 घरे पेटवली, 10 ठार

या घटनेत एकाच घरातून 7 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
Riot In WB
Riot In WBSakal

कोलकाता : पश्चिम बंगालमधील बीरभूममध्ये TMC नेत्याच्या (Murder) हत्येनंतर सोमवारी रात्री मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळला असून, मोठ्या संख्येने एकत्र आलेल्या जमावाने 10-12 घरांचे दरवाजे बंद करून आग लावली. या घटनेत एकाच घरातून 7 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत एकूण 10 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या भयंकर हिंसाचारानंतर पश्चिम बंगाल सरकारने घटनेच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे.(Riot After TMC Leader Murder In West Bengal)

मिळालेल्या माहितीनुसार, बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील रामपुरहाटमध्ये टीएमसी उपाध्यक्षाच्या हत्येनंतर बदला घेण्यासाठी ही घटना घडवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. हिंसाचारानंतर घटनेची माहिती मिळताच डीएमसह बीरभूमचे सर्व बडे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सोमवारी रात्री घडलेल्या या हिंसाचारानंतर 10-12 घरांना लावण्यात आलेल्या आगीत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर, एकाच घरातून 7 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, अशी माहिती बीरभूमच्या अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितली.

Riot In WB
मराठी शाळांमध्ये पहिलीपासूनच मिळणार इंग्रजीचे धडे : वर्षा गायकवाड

हिंसा का उसळली

बंगालमधील बीरभूममधील रामपूरहाट येथे सोमवारी रात्री उशिरा पंचायत नेते भादू शेख यांची हत्या करण्यात आली. शेख हे राज्य महामार्ग 50 वरून जात होते. त्यावेळी अज्ञातांनी त्याच्यावर बॉम्ब फेकला, ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना रामपूरहाट येथील मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

गेल्या वर्षीही हिंसाचारात 16 जणांचा मृत्यू

पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचाराची ही पहिलीच घटना नाहीये. गेल्या वर्षी निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर झालेल्या हिंसाचारात 16 जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com